पुजन केलेले पाणी कर्नाटकातील कँनॉलचेच | विक्रम सांवत | दरिबडचीतील बहिष्कार मागे

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील विकासासाठी दोन साखर कारखाने मंजूर केले आहेत.त्यासाठी घेतलेल्या जमिनी शेतकऱ्यांकडून बाजारभावानुसार घेतल्या आहेत.कुणाचीही फसवणूक केलेली नाही.तिकोंडी तलावात कर्नाटकच्या कँनॉलमधून पाणी आले आहे.आलेले पाणी आमदारांना खपत नसल्याने ते काहीही आरोप करत सुटले आहेत.जनता सुज्ञ आहे.त्यामुळे यावेळी माझा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन कॉग्रेस आघाडीचे उमेदवार विक्रमसिंह सांवत यांनी केले.

ते दरिबडची,खंडनाळ,पांडोझरी,भिवर्गी,करेवाडी तिकोंडी,कोणबगी,को. बोबलाद,गुळगुंजाळ,मोटेवाडी,लवंगा,जाळीहाळ बु ||,मोरबगी,गिरगांव, माणिकहाळ,अक्कळवाडी ,बोर्गी , बालगांव या गावातील प्रचार सभेत बोलत होते.

यावेळी माजी आमदार उमाजी सनमडीकर,अप्पाराया बिराजदार,पिराप्पा माळी,नाना शिंदे,संतोष पाटील,जालिंदर होनमाने,अण्णासाहेब कोडग,काका शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

सावंत म्हणाले,तूबची बबलेश्वरचे पाणी पूर्व भागातील सर्व गावांना मिळेपर्यत मी शांत रहाणार नाही,हे माझे वचन आहे. तिकोंडी तलावात आलेले पाणी पावसाचे नसून कर्नाटकातून आलेले आहे.आमदारांना पावसाच्या गढूळ पाण्यातील फरक समजू शकत नाही, ते काय जतला पाणी देणार,पाच वर्षे वाया घालवली.आता तिकोंडी,मोटेवाडी तलावात आलेले पाणी पुढे संख,सिद्धनाथ,भिवर्गीमार्गे बोर नदीतून सोनलगी पर्यत सोडण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.

सांवत म्हणाल,आम्ही दोन कारखाने शेतकऱ्याच्या नावाने मंजूर केले आहेत. सर्व उतारे आँनलाईन आहेत.कधीही , कुणीही बघु शकते.जमीन लुबाडून घेतल्याचे आरोप बिन बुडाचे आहेत.

सध्यांच्या आमदारांनी पाच वर्षात काय केले त्यांचा हिशोब मागा.मी केलेली  कामे दाखवतो,तुम्ही पण दाखवा असे उघड आव्हान विक्रमसिंह सावंत यांनी केले.

नाना शिंदे म्हणाले,भाजपा सरकार शेतकऱ्याना हमी भाव देऊ शकले नाही. तालुक्यातील द्राक्ष शेती आणि डाळींबा साठी सशोधन केंद्रे नाहीत.बेदाण्यावर टँक्स लावले,खते,औषधे,बियाणे घेणे शेतकऱ्यांना परवडत नाही.पिकविमा हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे.विक्रमदादा जतच्या राजकारणाला नवी दिशा देणारे नेतृत्व आहे.जतचा पाणी प्रश्न फक्त विक्रम दादाच सोडवू शकतात .

दरिबडचीचे संरपंच गंगाधर मोर्डी,उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांनी निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेत कमताने विक्रमसिंह सांवत यांना पाठिंबा दिला.

बहिष्कार घालून प्रश्न सुटणार नाहीत. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा लागेल.मी प्रयत्न करतोय.तुमच्या गावाला पाणी मीच देणार असे विक्रमसिंह सावंत यांनी उपस्थित लोकांना शब्द दिला.भाजपचे कार्यकर्तेराहुल मासाळ,आंबाण्णा माळी,सुशील मासाळ,शरद मासाळ,प्रमोद जाधव,अमोल मासाळ,तिप्पाण्णा पुजारी,श्रीरंग जाधव,विजय चिकाटे,रामा मासाळ यांनी सांवत यांना पाठींबा दिला.

भिवर्गीतील अप्पासो भूजबळ,वसंत पाटील,राजू पवार,राजू खोत यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दरिबडची ता.जत येथील प्रचारसभेत बोलताना विक्रमसिंह सांवत

Attachments area

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.