पाच वर्षात म्हैसाळसाठी 400 कोटी आणले आ.विलासराव जगताप : पंतगराव कदम,आर.आर.पाटील,यांनी जतचा विकास रोकला

0

Rate Card

डफळापूर, वार्ताहर : जत तालुका संपन्न झाला तर जिल्ह्याचे केंद्र बनेल.कॉग्रेस राष्ट्रवादीच्या तत्कालीन नेत्यांनी म्हैसाळ योजनेत संपूर्ण जत तालुक्याचा समावेश केला नाही.त्यामुळे पुर्व भागातील 48 गावांना आजही पाणी मिळत नाही.त्यामुळे वेगळी योजना करावी लागत आहे.तेथे तीव्र दुष्काळ सोसावा लागत आहे. गेल्या पाच वर्षात भाजपा सरकार आल्यामुळे ही सिंचन योजना पतप्रंधान सिंचन योजनेत समावेश केली आहे.त्यामुळे गेल्या पाच वर्षात या योजनेला 400 कोटीचा खर्च केले आहेत.हे पैसे दहा वर्षापुर्वी दिले असते तर ही योजना 100 कोटीत पुर्ण झाली असती.मात्र तत्कालीन मंत्री पंतगराव कदम,आर आर पाटील यांनी जतचा विकास होऊ दिला नाही असा आरोप आ.विलासराव जगताप यांनी केला.

आमदार जगताप हे तालुक्यातील वाषाण,शिंगणापूर, डफळापूर,येथे आयोजित  जाहीर सभेत बोलत होते.यावेळी खलाटी, मिरवाड, कुडणूर येथे कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या.सभेला परशुराम चव्हाण सर,आकाराम मासाळ,कुंडलिक दुधाळ,

मारुती पवार,रासपचे अजितकुमार पाटील,नागेश सोनूर, सुभाष पाटील, बंडू डोंबाळे,शिवसेनेचे अमित दुधाळ,आकाराम मासाळ,

सचिन मदने,रफिक शेख,आदी उपस्थित होते.

जगताप पुढे म्हणाले, जत साखर कारखान्याचे सलग सात गळीत हंगाम यशस्वी करून 24 कोटी रुपयांचे कर्ज फेडले.माझे तालुक्यात वर्चस्व निर्माण होण्याच्या भीतीने काँग्रेसच्या नेत्यांनी कारखाना लिलाव करून विकला.जतच्या पश्चिम, उत्तर,व दक्षिण भागात म्हैसाळ योजनेचे पाणी आले आहे. काही गावे या योजनेपासून अंशतः वंचीत असून त्यांना सिमेंट  पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होणार आहे,त्याची कामेसुद्धा युद्धपातळीवर सुरू आहेत.जत पूर्व भागातील 65 गावांना सुद्धा पाणी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे.मला आता कोणत्याही मोठ्या पदाची आवश्यकता नसून जत तालुक्यातील सर्व गावांना पाणी देणे हेच माझे अंतिम ध्येय व स्वप्न आहे.

बंडखोर उमेदवारांने मोठे पाप केले आहे. त्यांच्या पापाची शिक्षा मिळेल.आम्हाला जनतेचा जानाधार आहे.त्यांचा विजय निश्चित आहे.लोकांसाठी मी जेलमध्ये गेलो आहे.चाळीस वर्षात मी अनेक पक्षात जाऊनही माझ्या मागे जनता आहे.मात्र ज्या पक्षात गेलो तेथे प्रामाणिक काम केले आहे.कर्नाटकातून पाणी मिळण्यासाठी आंतरराज्य करार व्हावा लागतो.तरच पाणी मिळते,हे सर्वांना माहीत असताना विक्रम सावंत यांनी तुबची-बबलेश्वर योजनेचे तिकोंडी व मोटेवाडी तलावात आलेले पावसाचे पाणी पूजन करून लोकांची दिशाभूल केली आहे.जत विधानसभा निवडणुकीचे भाजपचे तिकीट मलाच मिळाले म्हणून अनेकजण तालुक्यात सांगत सुटले आणि पंधरा दिवसांत पक्षाविरुद्ध बंड केले. मला मिळालेली उमेदवारी ही जनतेतून मिळाली असून,गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन शेवटी आमदार जगताप यांनी केले.

कुंडलिक पाटील म्हणाले की,काँग्रेस पक्ष हाच जातीयवादी पक्ष आहे.विक्रम सावंत यांनी जिल्हा बँक,जिल्हा परिषद,बाजार समिती ही पदे घरातच ठेवली.या मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील यांना जिल्हा नियोजन मंडळावर सदस्यपदी डावलले.यामुळे सर्व जाती धर्माना सामावून घेणारे आमदार जगताप यांचे नेतृत्व श्रेष्ठ असून त्यांना मोठ्या मताधिक्याने ते विजयी होतील.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.