तालुक्याचा विकास हेच ध्येय ; डॉ.रविंद्र आरळी

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : माडग्याळ (ता.जत) येथे जत तालुका विकास आघाडीचे उमेदवार डॉ. रवींद्र आरळी यांनी बाजारात आलेल्या नागरिकांशी संवाद साधत पदयात्रा काढून जनतेच्या अडचणी जाणून घेतल्या.तर अडचणी येणार्‍या काळात ताकदीने सोडवू,असे आश्वासन दिले.

जत तालुका विकास आघाडीचे उमेदवार डॉ.रवींद्र आरळी यांच्या जत विधानसभा मतदार संघातील पदयात्रा आणि जाहीर सभांना मतदारांतून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.सकाळी 11 वाजता माडग्याळ मध्ये पदयात्रा काढली. दुपारनंतर आकळवाडी, गिरगाव, माणिकनाळ, अशा विविध गावात सभा घेतल्या.यावेळी पदयात्रेत डॉ .सार्थक हिट्टी, तमाणगोडा रवी पाटील,अँड.सी.आर. सांगलीकर,मन्सुर खतीब,सिद्धुआण्णा शिरशेड, डॉ.शेखर हिट्टी, लिंबाजी माळी, कामाण्णा बंडगर, कामदेव कोळेकर, सदाशिव माळी उपस्थित होते .

      यावेळी बोलताना रविंद्र अरळी म्हणाले,माझी उमेदवारी म्हणजे जनतेतून आहे.मी आज पर्यंत कोणतेही पद नसताना जनतेची कामे केली आहेत. लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला आपण आमदार म्हणून निवडून दिले. तर जत तालुक्यातील कोणतेच प्रश्न ठेवणार नाही. सर्वच प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.

माडग्याळ ता.जत येथील सभेत बोलताना डॉ.रविंद्र आरळी,बाजूस सुरेशराव शिंदे,श्रीपाद अष्टेकर, प्रभाकर जाधव आदी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.