रिपाइच्या एकत्रित ताकतीने आ.जगताप यांना मताधिक्याने निवडून आणू | संजयराव कांबळे

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : रिपाइ देशात महायुतीचा घटक पक्ष असल्याने पक्षाच्या धोरणानुसार जतचे भाजपचे उमेदवार आ.विलासराव जगताप यांना विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे,जतचा पाणी प्रश्नासह मागासपण दूर करण्यासाठी आ.जगताप सक्षम उमेदवार असल्याचे मत जिल्हाध्यक्ष संजयराव कांबळे यांनी व्यक्त केले.जत विधानसभा 2019 निवडणूक संदर्भात रिपाइच्या तालुक्याची बैठक प्रदेश सचिव विवेक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष संजयरावजी कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे, जत तालुका अध्यक्ष संजय एम. कांबळे, श्रीकांत होवाळे,जत तालुका युवा अध्यक्ष नारायण कामत,पश्चिम विभाग प्रमुख सुनील छत्रे, उत्तम कांबळे,लोकसभा अध्यक्ष संदेश भंडारे,अरुण आठवले, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष बसवराज चव्हाण, संजय विलास कांबळे, मातंग आघाडी युवा अध्यक्ष दुर्गाप्पा ऐवळे, प्रसिद्ध प्रमुख प्रशांत ऐदाळे,जत तालुका युवा कार्याध्यक्ष विनोद कांबळे, सोमशेखर कांबळे, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाष कांबळे, वंसत कांबळे, आवाण्णा कांबळे, तुकाराम कांबळे, लक्ष्मण कांबळे, हुच्चाप्पा कांबळे, राहुल चंदनशिवे, राजेश वर्मा, महेश कांबळे, काशिनाथ सकटे इ. मान्यवर उपस्थित होते.

संजयराव कांबळे पुढे म्हणाले,पक्ष संघटना मजबूत करुन सर्व सामान्य जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.दलित वस्ती सुधारणा निधीचा वापर करावा.

विवेक कांबळे म्हणाले,जत तालुक्याच्या उर्वरित पाण्याच्या प्रश्नसाठी आ.जगताप यांना निवडून देणे गरजेचे आहे.तालुक्याचा संपूर्ण अभ्यास असलेले आ.जगताप जनतेच्या हितासाठी प्रयत्न करत आहेत.त्यांचे हात बळकट करण्यासाठी रिपाइचे सर्व पदाधिरी,कार्यकर्ते एकदिलाने काम करणार आहेत.आभार विनोद कांबळे यांनी मानले.

जत येथील बैठकीत बोलताना जिल्हाध्यक्ष संजय कांबळे,बाजूस विवेक कांबळे,अशोक कांबळे,विकास सांबळे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.