जत एसटी स्टँड बनलय कचरा डेपो | व्यवस्थापकाच्या बंगल्यासमोर कचऱ्याचे ढिगारे | स्वच्छतेला तिराजंली

0

जत,प्रतिनिधी : जत शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या एसटी स्टँड मधील आगार व्यवस्थापकांच्या बंगल्या समोरचा परिसर कचरा डेपो बनला आहे.स्टँड व बसेसची स्वच्छता करणाऱ्या बेजबाबदार कर्मचाऱ्यांनी थेट स्टँडमध्ये कचरा डेपो बनविला आहे.या कचऱ्यामुळे प्रवाशाबरोबर परिसरातील दुकानदारांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.एकीकडे देशाचे पंतप्रधान स्व:ता स्वच्छेतेसाठी समुद्र किनाऱ्यावर कचरा उचलत आहेत.

Rate Card

परिवहन विभागाचे स्टँड परिसर स्वच्छ ठेवायचे आदेश असतानाही जत आगाराचे बेजबाबदार आगार व्यवस्थापकांच्या मुळे स्टँड परिसर दुर्गंधीने व्यापला आहे.आतातरी थेट आगार व्यवस्थापकाच्या बंगल्या समोरील खुल्या जागेत हा कचरा आणून टाकत डेपो बनविला आहे.आगार व्यवस्थापक येथे राहत नसल्याने त्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.या कचऱ्यामुळे येथे प्रवाशी लघुशंका करतात.स्टँड बाहेरील दुकानदार येथे उरलेले पदार्थ,सांडपाणी टाकतात.यातच सुरू असलेला डुकरांचा वावर कधी स्वाईन फ्यूलची साथ आणेल हे सांगता येत नाही अशी स्थिती बसस्थानकांची झाली आहे.

लबसेस व स्टँड मधून गोळा केलेला सर्व कचरा कर्मचारी येथे आणून टाकत स्वच्छतेला तिरांजली देत आहेत. 

काही अधिकाऱ्यांच्या सुचनेवरून कचरा टाकलाजत आगाराच्या काही अधिकाऱ्यांच्या सुचनेवरून कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कचरा भरलेले कटेनर येथे आणून ओतल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

जत स्टँड परिसरातील आगार व्यवस्थापकांच्या बगल्यासमोर कचरा टाकल्याने दुर्गंधी पसरली आहे.

  

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.