15 वर्षात का काढला नाही कारखाना | आ.विलासराव जगताप | कमी किंमतीत जमिनी घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक

0

जत,प्रतिनिधी :  जनतेशी काहीही देणेघेणे नसणारे उमेदवार केवळ मोठ्या प्रमाणावर पैसा आहे,म्हणून  निवडणुकीत उभे राहिले आहेत.अशा उमेदवारांना लुबाडण्याचे काम काही लोक करत आहेत.हे मतदारांनी ओळखून त्यांना त्यांची जागा दाखवावी.जत तालुक्यात साखर कारखाना काढतो म्हणून डफळापूर व लवंगा येथे  शेतकऱ्यांकडून कवडीमोल किमतीत जमिनी विकत घेतल्या.जमिनी विकत घेताना शेतकऱ्यांची व बेरोजगार युवकांना नोकरी लावतो म्हणून फसवणूक तर केलीच आणि आता 15 ते 20 वर्षे झाल्यानंतर आमदार विश्वजित कदम डफळापूर येथे साखर कारखाना काढणार असल्याचे सांगत लोकांची दिशाभूल करत आहेत.जमिनी विकत घेतल्यानंतर 15-20 वर्षे काय केले? याचे उत्तर आ.कदम यांच्याकडे नसून खोटं बोल पण रेटून बोल या काँग्रेसच्या संस्कृतीचे ते अनुकरण करीत असून काँग्रेसकडे प्रचाराला जत तालुक्यात कोणीच येत नसल्याचे पाहून ते जत तालुक्यात दौरे करत असल्याची टीका आ. जगताप यांनी करत तिसऱ्या आघाडीला चांगला बकरा सापडल्याचा टोला जाहीर सभेत लगावला.

जत तालुक्यातील मुचंडी, संख,सिद्धनाथ, जालिहाळ खुर्द,पांढरेवाडी,आसंगी तुर्क,धुळकरवाडी, कागनरी, कोणबगी, करेवाडी या भागात आयोजित प्रचार सभेत आमदार जगताप बोलत होते.

Rate Card

आमदार जगताप म्हणाले की,जनतेच्या जीवावर मी अनेक पदे भोगून तालुक्यात विकासाचे पर्व उभे केले.साखर कारखान्याचे सात गळीत हंगाम यशस्वी केल्याने माझे राजकारण संपविण्यासाठी चांगल्या पध्दतीने सुरू असलेल्या जत कारखान्याचा लिलाव करून तो विकण्याचे पाप केले.यापुढे माझे एकच ध्येय असून,माझ्या उर्वरीत आयुष्यात जत पूर्व भागासह तालुक्यातील एकही गाव पाण्यापासून वंचीत राहणार नाही यासाठी आमदारकी पणाला लावणे हे आहे.

जिल्हा परिषद सदस्या रेखा बागेळी, सरदार पाटील,माजी सभापती आर.के .पाटील,साहेबराव टोणे, रासपचे अजित पाटील,सरपंच अशोक पाटील,शशिकांत तेली,मल्लू सावकार,अशोक बिळूर,कामन्ना पाटील,राजेंद्र डफळे, बिराप्पा तांबे,रेवापा पांढरे,मेघराज राठोड,लच्छुराम राठोड,महादेव सरगर,तुकाराम मोटे आदी उपस्थित होते.

      

संख ता.जत येथील सभेत बोलताना आ.विलासराव जगताप,बाजूस आर के पाटील,रेखा बागेळी,कुडलिंक दुधाळ आदी

बातमी दोदोन

आ.जगताप यांच्या दुरदृष्टीमुळे जत पश्चिम भाग पाणीमय : कुडलिंक दुधाळ

जत,प्रतिनिधी :  कधी नव्हे ते जत तालुक्याला एक अभ्यासू व कणखर नेतृत्व मिळाले आहे.त्यामुळे गेल्या 35 वर्षात रखडलेली म्हैसाळ योजनेसह,रस्ते,वीज,जलसंधारणाची पाच वर्षात मोठ्या प्रमाणात कामे झालेली झालेली आहेत,ती केवळ आमदार जगताप यांच्या दूरदृष्टी नियोजनामुळे व सातत्यपूर्ण प्रयत्नाने झाली,असे प्रतिपादन माजी जि.प.सदस्य कुंडलिक दुधाळ यांनी केले.आ.जगताप यांच्या प्रचारार्थ त्यांनी विविध भागात प्रचार सभा घेतल्या.

दुधाळ म्हणाले,आमच्या जत पश्चिम भागात म्हैसाळ योजनेचे पाणी आलं असल्याने आमच्या भागात दुष्काळ संपला झाला आहे.त्यामुळे आम्ही ठरवलंय आमदार जगतापाना मोठं मताधिक्याने विधानसभेत पाठविणार आहोत.जत पूर्व भागातील नागरिकांनी जातीयवादी,फसवणूक करणाऱ्या भुलथापाला बळी न पडता आमदार जगताप यांना मोठं मताधिक्याने विजयी करावे.केंद्रात व कर्नाटकात भाजपचे सरकार आहे.राज्यात सुद्धा भाजप-सेना महायुतीचे सरकार येणार असल्याने जत तालुक्यात आमदार जगताप यांच्याशिवाय पर्याय नाही.डॉ. रविंद्र आरळी यांना जिल्हाधिकारी,जिल्हा परिषद ,पंचायत समिती, तहसील कार्यालय,ग्रामपंचायत या संस्थाचा कारभार कसा चालतो,टँकर,छावण्या या घटकांची माहिती नाही,कारण ते उभ्या आयुष्यात दवाखाना सोडून कधी बाहेर पडले नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.