स्वच्छ चेहरा असलेले डॉ.आरळींना विजयी करा : प्रकाशराव जमदाडे

जत,प्रतिनिधी : गेल्या पाच वर्षात आम्ही पक्षाचे प्रामाणिक काम केले,मात्र पक्षाने आम्हची दखल घेतली नाही.त्यामुळे आम्हच्या स्वाभिमानासाठी जत तालुका विकास आघाडीतून डॉ.रविंद्र आरळी यांच्या रूपाने सक्षम उमेदवार सभा केला आहे.त्यांच्या विजयासाठी पुर्ण निष्ठेने व मोठ्या ताकतीने काम करून आरळी यांचा विजयश्री खेचून आणू,असे मत पुणे रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी व्यक्त केला.
जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.रवींद्र आरळी यांच्या प्रचारार्थ वळसंग,गुड्डापुर आदी गावात झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी माजी ज्येष्ठ नेते शिवाजीराव ताड, सभापती सुरेशराव शिंदे, सभापती तम्मनगौडा रवी पाटील, माझी जि.प.सदस्य रमेश पाटील,महादेव हुचगोंड,आदी उपस्थित होते.
प्रकाशराव जमदाडे पुढे म्हणाले, तालुक्यात लोकांना बदल हवा आहे. नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी, या भावनेतून सर्व पक्षातील नेते व कार्यकर्ते यांनी पक्षाचे झेंडे, राजकीय विचार बाजूला ठेवून स्वाभिमानी विकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्रित आलो आहे.तालुक्याचा विकास व्हावा, हीच अपेक्षा ठेवून सर्व कामाला लागले आहेत. यापूर्वीचा इतिहास पाहिला तर तालुक्यातील जनतेने नेहमी बदल घडवून आणला आहे. नव्या चेहर्यांना संधी देण्याचे काम केले आहे. त्यामुळे काँग्रेस व भाजपमधील प्रस्थापित नेत्यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने पक्षातील नेत्यांसह जनतेमध्ये नाराजी पसरली आहे. यंदाही चमत्कार घडेल त्यामुळे येणाऱ्या काळात तिसर्या आघाडीचे उमेदवार डॉ. रवींद्र आरळी यांना जनता मोठ्या मताधिक्याने निवडून देतील,असा विश्वास जमदाडे यांनी व्यक्त ला.
जत: डॉ.आरळी यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत बोलताना माजी सभापती प्रकाशराव जमदाडे
Attachments area
