आमदारांची माहिती मागवा,कळेल विकास किती झाला | आ.विश्वजीत कदम

0

माडग्याळ मध्ये रेकार्डब्रेक सभा

 

माडग्याळ,वार्ताहर : तरूणानो,विद्यमान आमदारांच्या कामाची माहितीच्या अधिकारातून माहिती मिळवा,तुमच्या लक्षात येईल पाच वर्षात त्यांनी काय केलय.विकासाच्या पोकळ गप्पा मारणाऱ्या आमदाराविरोधात मोठे जनमत उभे झाले,असून यंदा परिवर्तन अटळ असे प्रतिपादन आ.विश्वजीत कदम यांनी केले.

कॉग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विक्रम सांवत यांच्या प्रचारार्थ माडग्याळ येथे सभा घेण्यात आली. या सभेला रेकार्डब्रेक गर्दी झाली होती.यावेळी उमेदवार विक्रमसिंह सांवत, माजी आमदार उमाजीराव सनमडीकर, अप्पाराया बिराजदार,महादेव पाटील,बाबासाहेब कोडग,संतोष पाटील,नाना शिंदे,महादेवराव,पिराप्पा माळी,अंकलगी,दिग्विजय चव्हाण,आप्पा मासाळ,रवींद्र चव्हाण,स्वा.शेतकरी संघटनेचे बाळू कोरे,नगरसेवक मंगेश चव्हाण,सदू माळी,अभिजित चव्हाण , रामगोंडा संती,नामदेव काळे,भूपेंद्र कांबळे, साहेबराव कोळी,पिराप्पा माळी, अण्णासाहेब कोडग,बाळ निकम ,विकास माने,आकाश बनसोडे,निलेश बामणे राजेंद्र जेऊर,भाऊरव्वा भिमोती तिकोटी, उपसरपंच लिंगाप्पा सिद्धाप्पा हट्टी,पी. एम.माळी,महादेव आमगोंड राजगोंड,अनिल माळी, सरपंच अप्पू जत्ती,मल्लाप्पा धुमाळे,बाळू माळी,दत्ता बंडगर,व्हनाप्पा माळी,दादा करगणीकर, मारूती कोरे महातेश गौडा बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.

विश्वजीत कदम पुढे म्हणाले , 

अर्ज भरला त्या दिवशीच विक्रम सावंत यांच्या बाजूने निकाल निश्चित झाला आहे.आता निकाल जाहीर होणे बाकी आहे.परिवर्तन नक्की होणार आहे.भाजप युतीचे हे फसवे सरकार आहे.शेतकऱ्यांचे

कर्ज माफ झाले नाही.शेतकऱ्यांच्या खात्यत पैसे जमा झाले का ? यांचा विचार मतदारांनी करावा

Rate Card

कदम म्हणाले,तूबची बबलेश्वर योजना विक्रम सावंत यांची संकल्पना आहे.यामुळे जतच्या पूर्व भागाला पाणी मिळणार आहे.आम्ही योजना पुर्ण करणारचं,जर पाणी नाही मिळाले तर मी जत मध्ये पाय ठेवणार नाही.अमित शहा काल आले आणि काश्मीर वर बोलले यामुळे जतला पाणी येणार आहे का ? महाराष्ट्राची निवडणूक स्थानिक मुद्द्यावर लढा,जतचा दुष्काळावर बोला, बेरोजगारीवर बोलण्याची आवश्यकता होती.मात्र त्यांनी महत्वाचे मुद्दे टाळले.

पाच वर्षात बेरोजगार तरूणांसाठी काही केले नाही. इथला तरूण रोजगारीसाठी स्थलातरीत झाला आहे.

विक्रमसिंह सावंत म्हणाले ,

तूबचे बबलेश्वर योजना मी मांडली तेव्हा माझी खिल्ली उडवली,आता अमित शहा मात्र जतच्या पूर्व भागात पाणी देण्याची भाषा बोलतात.तिकोंडी तलावात पाणी आले,तेव्हा विरोधक म्हणतात हे पावसाचे पाणी आहे.हे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत.आपल्या चुकीच्या निर्णयामुळे पाच वर्षे वाया गेली आहेत.

तुम्ही 21 तारखेचा एक दिवस माझ्यासाठी द्या,पुढची पाच वर्षे मी तुमच्यासाठी घरगड्यासारखे काम करीन तूबची बलेश्वरचे पाणी तिकोंडी तलावात आले आहे.पुढच्या टप्प्यात सिद्धनाथ,संख,भिवर्गी,सोनलगी या गावंना मिळावे म्हणून प्रयत्न सुरु आहेत. 

माडग्याळ ता.जत येथील सभेत बोलताना आ.विश्वजीत कदम,बाजूस विक्रमसिंह सांवत,उमाजी सनमडीकर आदी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.