अंशतः वंचीत गावांना म्हैसाळचे सिमेंट पाईपलाईनद्वारे लवकरच पाणीपुरवठा | आ.विलासराव जगताप

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : मागील महिन्यात संपूर्ण जत तालुक्याचा दौरा केला आहे. अनेक ठिकाणी सर्वांची प्राधान्याने एकच मागणी समोर आली ती म्हणजे पाण्याची,कारण अनेक गावातील रस्ते, वीज,जलसंधारण आदी कामे झालेली असून आता सर्वांची फक्त पाण्यासाठी एकच व एकमुखी मागणी होत आहे.जतच्या पश्चिम, उत्तर,व दक्षिण भागात म्हैसाळ योजनेचे पाणी आले आहे. काही गावे या योजनेपासून अंशतः वंचीत असून त्यांना सिमेंट  पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होणार आहे,त्याची कामेसुद्धा युद्धपातळीवर सुरू आहेत.जत पूर्व भागातील 65 गावांना सुद्धा पाणी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे.त्यासाठी 600 कोटी रुपयांचा आरखडा तयार असून तोसुद्धा तातडीने मंजूर होणार असून जत तालुक्यातील सर्व गावांना पाणी देणे हेच माझे अंतिम ध्येय व स्वप्न असल्याची  ग्वाही भाजप-शिवसेना-रासप-आरपीआय-रयतक्रांती महायुतीचे उमेदवार आमदार विलासराव जगताप यांनी दिली.आमदार जगताप जत तालुक्यातील देवनाळ ,मेंढीगिरी ,खोजनवाडी,सिंदूर,बसर्गी,गुगवाड,वज्रवाड,एकुंडी,जिरग्याळ ,खिलारवाडी,उमराणी,बिळूर,साळमळगेवाडी,येळदरी येथील आयोजित प्रचार सभेत बोलत होते.यावेळी माजी सरपंच मारुती पवार,रासपचे अजितकुमार पाटील,शिवसेनेचे अमित दुधाळ,सचिन मदने,रफिक शेख,पप्पू कारंडे आदी उपस्थित होते.

आमदार जगताप पुढे म्हणाले की,कर्नाटकातून पाणी मिळण्यासाठी आंतरराज्य करार व्हावा लागतो.तरच पाणी मिळते,हे सर्वांना माहीत आहे.जत विधानसभा निवडणुकीचे भाजपचे तिकीट मलाच मिळाले म्हणून अनेकजण तालुक्यात सांगत सुटले.पण मी कोणाकडेही विधानसभेच्या तिकिटाची मागणी केली नाही.भाजपने जत तालुक्यात अंतर्गत सर्व्हे केला, आणि कोण निवडणूक सक्षमपणे लढवू शकतो, कोणाची राजकीय कार्यकिर्द व तालुक्यासाठी कोनाचे योगदान आहे या सर्व कसोटीवर माझे नाव पुढे आले. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्याने मला मिळालेली उमेदवारी ही जनतेतून मिळाली असून,गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन शेवटी आमदार जगताप यांनी केले.यावेळी आप्पासाहेब नामद,रामन्ना जीवन्नवर,बिरापा उत्तरे,संगापा पाटील,नागन गौडा पाटील,राजू कुंभार, विठ्ठल दुधाळ,रमेश बिराजदार, महेश संती,बसापा चंडी,गंगापा हारुगेरी, शिवाप्पा तावशी,किशोर बामणे,आलगोंडा समगोंडवार,आणापा अंदानी, बाळगोंडा चिंतामणी,चिदानंद चौगुले, बसवसेनेचे बसवराज पाटील,चिदाणंद ढोले, माणिक कोरे,भाऊसाहेब लोखंडे, बाबासाहेब ओलेकर,आन्नू खांडेकर,खंडू भिसे,आदी उपस्थित होते.

जत : देवनाळ ता.जत येथील प्रचार सभेत बोलताना आ.विलासराव जगताप

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.