पावसाच्या दिवसात नागरिकांनी दक्षता घ्यावी : तहसीलदार सचिन पाटील

0

नालाबांध साठी इमेज परिणाम

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यामध्ये सध्या परतीचा पाऊस चालू आहे. त्यामुळे अनेक ओढे,तलाव,शेततळे,

व नालाबांध भरलेले आहेत.काही ठिकाणी यापुढील काळात पाऊस सुरू राहीलेस त्याठिकाणचेही तलाव, शेततळे व नालाबांध भरणेची शक्यता आहे.पुर्व,दक्षिण,उत्तर भागातील काही

ओढे,नाल्यामध्ये पाणी वाहत आहे.त्यामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.पावसाच्या पाण्यामुळे तिप्पेहळ्ळी येथील गट नं 122 मधील नालाबांध भरलेला होता. त्याठिकाणी सानीका रामा भिसे(वय 10 वर्ष) कु कोमल रामा भिसे (वय 7)दोघी रा.तिप्पेहळ्ळी या दोन मुलींचा नालाबांध लगत जनावरे चारणेसाठी गेलेल्या असता पाण्यात पडून बुडून मुत्यू झाला.तसेच सनमडी येथील तलावात उत्तम पांडुरंग टोणे,(वय

Rate Card

28 वर्ष,रा.टोणेवाडी) हे तलावात बुडालेली मोटार काढणेसाठी गेलेले असता तलावात बुडालेले आहेत.

त्यामुळे सर्व शेतकरी व नागरीक यांनी नदी,ओढे नाल्यास पाणी आले असल्यास तसेच पुलावरून पाणी वाहत असल्यास नदी नाले ओलांडू नयेत.लहान मुले एकटी जलाशयांजवळ जाणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी. शेततळयांमध्ये प्लॅस्टिक कागद टाकलेला असल्यामुळे तसेच शेवाळ आल्यामुळे काठ निसरटे झालेले असतात, तलाव नालाबांध इत्यादी मध्ये साठलेल्या पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे नदी, तलाव,नालाबांध यामध्ये पोहण्यास जाण्यास टाळावे. तलावामध्ये पाणी वाढत असलेने इलेक्ट्रीक मोटारी काढणेसाठी इत्यादी कामासाठी जाणे टाळावे.लहान मुले, वृध्द नागरीक व महिला यांनी एकटे जलाशयाचे ठिकाणी जाणे टाळावे असे सर्व शेतकरी व नागरीक यांना प्रशासनाकडून आवाहन करणेत येत आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.