डफळापुर कारखान्याचे काम जानेवारीपासून सुरू करणार : आ. विश्वजीत कदम

0

जत,प्रतिनिधी : भाजपचे आमदार विलासराव जगताप यांनी तूबची बबलेश्वर योजनेतून पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विक्रम सावंत यांची खिल्ली उडवली. उलट सत्ताधारी आमदार असताना यासाठी प्रयत्न केला नाही. आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी तुबची योजनेतून पाणी मिळू शकते. याची खात्री जाहीर सभेतच करून दिली. त्यामुळे तुबचीबद्दल त्यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे, अशी टीका आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी पत्रकार बैठकीत केली.अमित शहा यांनी दुष्काळी भागात सभा घेऊन दुष्काळी भागासाठी महत्त्वपूर्ण विकासकामांची घोषणा करणे अपेक्षित होते. परंतु, कश्मीर 350 कलम हटवून जणू दुष्काळी भागातील बद्दल महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे भासवले. ही राज्याची निवडणूक असून राज्य सरकारने किती विकास कामे केली, यावर शहा यांनी चुकीची आकडेवारी सांगून सभेचे मैदान गाजवले. मात्र, या सभेसाठी बाहेरची माणसे बोलवण्याचे वेळ आली. केवळ 4000 लोक याठिकाणी उपस्थित राहिले, हा राष्ट्रीय अध्यक्षाचा अपमानच म्हणावा लागेल. असे कदम यांनी सांगितले.काँग्रेस-राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीचे अधिकृत उमेदवार विक्रम सावंत यांच्या प्रचारार्थ आ विश्वजीत कदम जत तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्याने माडग्याळ गटात प्रचार दौरा केला.

आ. विश्वजीत कदम पुढे म्हणाले, फडणवीस सरकारने शेतकरी हिताचे कोणतेही निर्णय पाच वर्षात घेतलेले नाहीत. यामुळे राज्यात आघाडी पेक्षाही 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. खोटे बोल पण रेटून बोल, या म्हणीप्रमाणे शहा यांनी फडणवीसांचे पाठ थोपटली. या सरकारच्या खोट्या आश्वासनाला कंटाळून राज्यात परिवर्तन होणार आहे. पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला आहे.

    तसेच तुमची बबलेश्वर योजनेतून पाणी मिळत असतानाही सत्ताधारी पक्षाचे आमदार असताना याचा पाठपुरावा केला नाही. याबाबत मौन पाळले. या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. मुळात या शासनाचा कल ग्रामीण विकासापेक्षा शहरी विकासावर जास्त आहे. तसेच राज्यातील धनगर, मुस्लिम समाजाची घोर फसवणूक केली आहे. तर गुन्हेगारी व भ्रष्ट कारभार असणाऱ्यांना पाठीशी घालून या सरकारने राज्याला स्थिर सरकार दिले आहे. असा टोला ही लगावला.

तालुक्याचा अनुशेष भरून काढण्यात या शासनाला अपयश आलेले आहे. त्यामुळे विक्रम सावंत सारखा तरुण चेहरा व तालुक्या बाबत कळवळा असणारा नेत्याला तालुक्यातील जनता संधी देईल, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.

   

Rate Card

डफळापुर कारखान्याचे काम जानेवारीपासून सुरू करणार 

जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी लवंगा व डफळापुर येथे साखर कारखाना करण्यात येणार आहे. विरोधकांनी याबद्दल कोणतीही अफवा पसरवली तरी यात तथ्य नसणार आहे. कारण डफळापुर येथील कारखान्याचे काम येत्या जानेवारी महिन्यामध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे कदम साहेबांनी दाखवलेली भूमिका दुष्काळी जनतेच्या हिताची ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.