जत तालुक्यातील विकासासाठी आ.जगताप यांनाच विजयी करा : दुधाळ व सावंत

0

Rate Card

शेगाव,वार्ताहर : 2019 ची विधानसभा निवडणूक ही कोणाचा पराभव करण्यासाठी नसून विकासाला चालना देणाऱ्या कणखर नेतृत्व निवडण्याची ही निवडणूक आहे.जत तालुक्याला एक कणखर नेतृत्व आमदार विलासराव जगताप यांच्या रूपाने मिळाले आहे.तालुक्याच्या पश्चिम,उत्तर व दक्षिण भागात म्हैसाळ योजनेचे पाणी आले आहे. या योजनेचे पाणी या भागातील उर्वरीत गावांना मिळण्यासाठी सध्या सिमेंटच्या पाईपलाईनने पाणी देण्यासाठी युद्धपातळीवर कामाचा झपाटा सुरू आहे.तालुक्यातील रस्ते,वीज,जलसंधारनाची कामे आदी प्रश्न सुटलेले आहेत.आमदार जगताप हे विकासाचा ध्यास घेणारे अभ्यासू नेतृत्व असल्याने जत तालुक्याच्या पूर्व भागाचा पाणीप्रश्न यापुढच्या काळात निश्चितपणे सुटणार आहे.केंद्रात व कर्नाटक राज्यात भाजपचे सरकार,आणि महाराष्ट्रातसुद्धा भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार नक्की येणार असल्याने जत तालुक्यात सुद्धा याच विचारांचे  नेतृत्व म्हणून आमदार जगताप यांना विजयी करणे गरजेचे असून काहीही करून या विधानसभेला आमदार जगतापांना पाठवू या असे आवाहन शिवसेनेचे अमित दुधाळ व माजी सभापती शिवसेनेचे नेते संजीवकुमार सावंत यांनी केले.

भाजप-शिवसेना-रासप-आरपीआय-रयत क्रांती या महायुतीचे उमेदवार आमदार विलासराव जगताप यांच्या प्रचारार्थ,शेगाव,लोहगाव,आवंढी,मोकाशेवाडी,बागलवाडी येथे आयोजित  केलेल्या जाहीर सभेत दुधाळ व सावंत बोलत होते.यावेळी लक्ष्मण बोराडे,सचिन बोराडे,हरी शिंदे,किशोर बुरुटे, माणिक पाटील,सुभाष पाटील,अच्युतराव काशीद,शहाजी गायकवाड,अरुण  खांडेकर आदी उपस्थित होते.

शेगाव ता.जत येथील आ.जगताप यांच्या प्रचार सभेत बोलताना संजीवकुमार सांवत

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.