डॉ.रविंद्र आरळींना वचिंत आघाडीचा पांठिबा | वंचितांना संपवू पाहणाऱ्यांना जागा दाखवा : अमोल पांढरे

0
Rate Card

जत,प्रतिनिधी: वंचित बहुजन आघाडीला संपविण्याचा घाट काही प्रस्थापित लोकांनी केली.आमची फसवणूक केली. मात्र, वंचित आघाडी गप्प बसणारी नाही. या निवडणुकीत याचा हिशेब घेऊ, प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून देऊ, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अमोल पांढरे यांनी व्यक्त केली. 

जत तालुक्यातील गुड्डापूर येथे जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार डॉ. रवींद्र आरळी यांना वंचित बहुजन आघाडी व दलित महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी शिवाजीराव ताड, सभापती तम्मनगौडा रवी पाटील, माजी सभापती सुरेशराव शिंदे, रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे,अँड.सी.आर. सांगलीकर, रमेश पाटील, शरनाप्पा आक्की, शिध्दुआण्णा शिरसाड, वंचितचे अमोल साबळे, दलित महासंघाचे प्रकाश देवकुळे, श्रीमक्कळ आदी उपस्थित होते. 

यावेळी डॉ. रवींद्र आरळी यांनी पाठिंबा स्वीकारत तालुक्यातील सर्वच वंचित घटकांना आपण न्याय देण्याचे काम करणार आहे. मुख्य म्हणजे येथील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नांसाठी प्रसंगी आमदारकी पणाला लावू. तर शहरातील विकासाचे नवे व्हिजन तयार करून शहराचा कायापालट करण्याचे ध्येय निश्चित केले जाणार आहे. 

यावेळी प्रकाश जमदाडे म्हणाले, भाजपचा एबी फार्म मुंबईतून विकत आणला तर काँग्रेसने वारसांना जपले आहे. त्यामुळे स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार डॉ. रवींद्र आरळी यांना जनतेचा एबी फार्म आहे. त्यामुळे स्वाभिमान जपण्यासाठी तिसरी आघाडीची स्थापना केली आहे. राजकीय झेंडे, राजकीय विचार बाजूला ठेवून काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपचे नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे जनता काँग्रेस व भाजप सोबत न जाता, तालुक्यात बदल घडले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गुड्डापूर :  विकास आघाडीचे उमेदवार डॉ. रविंद्र आरळी यांना वंचित आघाडीने पांठिबा दिला.

फोटो मोठा करा

Attachments area

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.