येळवीत चोरट्यांनी दिवसा घर फोडले

0
Rate Card

येळवी,वार्ताहर : येळवी येथील मळ्यातील बबन ज्ञानोबा शिंदे यांचे बंद घर दिवसा चोरट्यांनी फोडून 18 हजार रूपयाचा मुद्देमाल लंपास केला.

अधिक माहिती अशी, बबन शिंदे हे त्यांच्या शेतातील घरात राहतात.शुक्रवारी सकाळी शेतीतील कामासाठी ते घर बंद करून बाहेर गेल्याचा फायदा घेत सकाळी 11 च्या सुमारास चोरट्यांनी घरात घुसत सोन्याचे दागिणे, रोख रक्कमेसह 18 हजार रूपयाचा मुद्देमाल लंपास केला.याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

कोळीगिरीतून एकाचे अपहरण

जत,प्रतिनिधी : कोळीगिरी ता.जत येथील भैरू बाबू नरूटे यांचे जबरदस्तीने चौघानी अपहरण केल्याचा गुन्हा जत पोलीसांनी दाखल केला आहे.अधिक माहिती अशी, पैशाच्या देवाणघेवाण वरून भैरू यांचे गावातील दत्तात्रय देवाप्पा सिंद्दरेडी व अनओळखी तिघांनी बुलेरो गाडी नं.एम एच 13,एक्यू 0414 यां गाडीत जबरदस्तीने बसवून अपहरण केल्याचे अपहरण झालेल्या भैरूचा मुलगा अनिल नरूटे यांने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी सिंदूरच्या तिघावर गुन्हा दाखल

जत,प्रतिनिधी : सिंदूर ता.जत येथे एकास जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी जत पोलीसांनी तिघावर गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी, गावातील सदाशिव तारव्वा कांबळे वय 26 यांला यापुर्वी दाखल केलेला जातीवाचक शिवीगाळ प्रकरणीचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने विकास मल्लू कळ्ळोली,मल्लिकार्जुन बसप्पा सवदी,सुरेश नंदाप्पा मुडसी रा.सिंदूर यांनी लाथाबुक्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.व जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.