जनतेला फसविणाऱ्या भाजप,कॉग्रेसला हद्दपार करा : विक्रम ढोणे

0
Rate Card

जत प्रतिनिधी: दुष्काळी जत तालुक्यातील जनतेची अनेक वर्षे पाणी प्रश्नांवर भावनिक फसवणूक केलेल्या भाजप कॉग्रेसला या तालुक्यातील जनतेने हद्दपार करावे,असे आवाहन अपक्ष उमेदवार विक्रम ढोणे यांनी केले 

लोकसभा निवडणुकीपुर्वी तत्वतः मान्यतेचे गाजर दाखवून भाजपने या तालुक्यातील जनतेची दिशाभूल केली आहे.त्याला कांग्रेसचे नेतेही मुकसमंती देऊन त्यांच्या चुकीच्या गोष्टीला अप्रत्यक्षपणे पाठिंबाच होता. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना पराभूत करून तालुक्यातील जनतेच्या भावनेशी खेळणाऱ्यांना धडा शिकवावा.

यावेळी ज्या भाजपला जतच्या जनतेने सलग पंधरा वर्षे आमदार केलं त्या जतच्या जनतेची भाजपने निराशाच केली आहे.आणि या सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुध्द कांग्रेसने कधीही विरोध केला नाही आज निवडणुकीत जनतेच्या प्रश्नांचा उमाळा फुटला आहे.तो फक्त या निवडणूकीसाठींचा खटाटोप चालू आहे. 

विक्रम ढोणे म्हणाले,

स्वाभिमान नसलेले लोक स्वाभिमानी आघाडीची भाषा करतात हेच जतकरांचे दुदैर्व आहे प्रत्येक निवडणूकीला वेगळी भुमिका घेऊन जतच्या नेते मंडळीनी जतचे वाटोळे केले आहे.ही कोणत्याही एका विचारधारेचे नसून व्यक्तीगत स्वार्थापोटी एकत्र येऊन जतच्या जनतेला स्वाभिमानीची भाषा बोलत आहेत. या सर्व नेत्यांना जतच्या जनतेने ओळखले असून आता तालुक्यातील स्वाभिमानी युवकांनी मला विधानसभा निवडणुक लढवण्याचा आग्रह केला असल्याने मी निवडणूकीला सामोरे जात आहे.तालुक्यातील युवक,जनता जागृत झाली,असून तोच या निवडणुकीत ऐतिहासिक क्रांती करत मला विजयी करेल.त्या क्रांतीचे तुम्ही भागिदार व्हावे असे आवाहन विक्रम ढोणे यांनी केले.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.