खड्डेयुक्त रस्त्यांनी मणके ‘खिळखिळे’ | ऐन निवडणूकीत जनता बेहाल | जत शहरात कचरा,रस्त्याची पुर्ती वाट,

0

Rate Card

जत,(का. प्रतिनिधी) जत नगरपरिषद सह तालुक्यातील अनेक गावचे रस्तांचा धांडोळा घेतला असता.शहरासह तालुक्यातील अनेक गावाना जोडणारे सर्वच रस्त्यांची भयावहता स्पष्ट झाली.या रस्त्यामुळे नागरिकांचे मणके खिळखिळे होत आहेत. अनेकांना मणक्यांचे आजार बळावत आहेत.दुचाकीसह चारचाकी वाहनाचे अपघात होऊन चालकांना जायबंदी व्हावे लागत आहे. काहीना कायमचे अपंगत्व येत आहे.ऐन निवडणूकीत शहरातील रस्त्याचा प्रश्न बाजूला पडला आहे.कोणताही उमेदवार यावर बोलायला तयार नाही.शहरातील रस्ते सर्वाधिक बिकट झाले आहेत.खड्डेमय रस्त्यामुळे नागरिक मुख्य बाजार पेठेत येण्यास टाळत आहेत.इतकी वाईट अवस्था शहरातील रस्ताची झाली आहे.रिमझिम पाऊस झाला तर चालताही येत नाही.

लोकप्रतिनिधीं,अधिकारी,कर्मचारी आणि प्रशासन मात्र कमालीचे निगरगट्ट बनून कोडके झाले आहे. त्यांनी सामान्य नागरिकांना रस्ता ही साधी मुलभूत सुविधा पुरविण्याचीही चाड दिसून येत नाही. त्यामुळे संपुर्ण तालुक्याभरच रस्त्यासाठी आक्रोश सुरू आहे.
जत: शहराच्या विकासावर दरवर्षी कोट्यावधीचा रुपयांचा निधी खर्च होतो. त्यात रस्त्यांच्या डागडूजीवर सर्वाधिक खर्च होतो. मात्र प्रंचड खर्चानंतरही एकही रस्ता सुस्वरूपात नाही. शहराच्या मध्यवर्ती,

गावातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत.त्यात साचणाऱ्या पाण्यामुळे नुकसानीचे प्रमाण वाढले आहे.शहरवाशियाना वाहने चालविणेही कठीण झाले आहे. यापेक्षाही भयावह स्थिती शहराच्या वाढीव क्षेत्रात आहे.या भागात वाहन चालविताना गावखेड्यातील पांणद रस्त्यावर असल्याचा भास होतो आहे.

शहरातील जनता यावेळी कुणाला करणार धोबीपछाड

शहरातील बिकट रस्त्यामुळे ग्रामस्थ कुणाला दणका देणार असा प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहे.मोठी आश्वासने देऊन शहरातील रस्ते सुधारता आले नाहीत.त्यामुळे जनतेत मोठी नाराजी आहे.त्यामुळे या विधानसभा निवडणूकीत आपली ताकत दाखविणार आहे. राडेराड रस्ते,दुर्गंधी युक्त पाणी,अस्वच्छता हे प्रश्न सुटणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जत शहरातील स्मशान भूमीजवळ थेट रस्त्यावरच कचरा टाकला आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.