मोहन माळी स्कूलला केंद्रीय बोर्ड(CBSE)चा परवाना

कवटेमहांळ : अभिनव फौंडेशन संचलित मोहन माळी इंटरनँशनल स्कूल अलकूड(एस)ला केंद्र शासनाच्या सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन(सि.बी.एस.ई.)चा (सांकेतिक क्रमांक) अपलीकेशन नं.1130881 हा प्राप्त झालेला आहे.अडीच वर्षात असा बहुमान मिळवणारे मोहन माळी स्कूल जिल्ह्यात पहिले ठरले आहे.आपल्या गुणवत्ता व विद्यार्थी विकासाच्या जोरावर मोहन माळी स्कूलचा राज्यासह राज्याबाहेरही नावलौकिक निर्माण केला आहे.यांची देश पातळीवरील सि.बी.एस.ई.बोर्डाने दखल घेत असा परवाना देत सम्मानित केले आहे.अलकूडच्या भोंड्या माळावर उभारलेले हे शैक्षणिक संकुल देशाच्या यादीवर आले आहे. गुणवत्ता पुर्ण शिक्षण पध्दती,प्रशिक्षित शिक्षक,अत्याधुनिक सुविधा यामुळे राज्यात अल्पावधीत मोहन माळी स्कूलने प्रगती साधली आहे.स्कूलच्या या यशाबद्दल सर्व शिक्षक,कर्मचाऱ्यांचे स्कूलचे संस्थापक मोहन माळी,सचिव नेहा माळी यांनी विशेष कौतुक केले.मोहन माळी म्हणाले,ड्रीम शहरात दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सुविधा आम्ही येथे देत आहोत.केंद्रशासनाने आम्हची दखल घेतल्याने आम्हचा विश्वास दुणावला असून राज्यभर नाव होईल अशी गुणवत्ता, व शैक्षणिक संकुल करू असा विश्वास माळी यांनी व्यक्त केला.मोहन माळी स्कूलचा विस्तीर्ण परिसर
