जतची जनता इतिहास घडवणार : डॉ.रविंद्र आरळी

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील जनता स्वाभिमानी आहे.त्यामुळे यंदा मला प्रचंड मतानी विजयी करत इतिहास घडवणार असे प्रतिपादन स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार डॉ.रविंद्र आरळी यांनी केले.

मेंढेगिरी, उंटवाडी या गावातील ग्रामस्थांसोबत डॉ.आरळी यांनी संवाद साधला.यावेळी माजी सभापती प्रकाश जमदाडे,मन्सूर खतीब उपस्थित होते.डॉ.आरळी पुढे म्हणाले,लोकांचा जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडीवर प्रचंड विश्वास असून जत तालुका स्वाभिमान विकास आघाडीच जत तालुका विकासाच्या मार्गावर नेऊ शकते असा विश्वास लोक बोलून दाखवतात. आपण सर्वांनी माझ्यावर दिलेली ही जबाबदारी मी तालुक्यात विकासाची गंगा आणून नक्की सार्थ करून दाखवेन.प्रकाश जमदाडे म्हणाले,जतच्या वंचित गावांना पाणी व प्रंलबित प्रश्न सोडविण्यासाठी लोकमताचा उमेदवार आम्ही उभा केला आहे. त्यांच्या मागे जनतेनी ताकत लावावी.मन्सूर खतीब म्हणाले,जतच्या जनतेच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार आतापर्यतच्या राजकर्त्यांनी केला आहे.विकास झाला म्हणून थापा मारून कोणी मत मागत असेलतर यावेळीजनतेची ताकत दाखवा.जतच्या इतिहासात प्रथम स्वच्छ,चारिञ्यवान,उच्चक्षित उमेदवार डॉ.आरळींना मोठ्या मताधिक्याने विजयी करा.

Rate Card

जत विकास आघाडीचे उमेदवार डॉ.रविंद्र आरळी यांनी झंझावत प्रचार सुरू केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.