तालुक्यातील सिंचन योजनेसाठी आमदारकी पणाला लावू : आ.विलासराव जगताप | खलाटीतून प्रचाराचा शुभारंभ

0

जत,प्रतिनिधी :  गेल्या पाच वर्षात 70 गावांना पाणी पोहचवले आहे.उर्वरित पुर्व भागातील 48 गावांना येत्या वर्षभरात पाणी पोहचवण्यासाठी आमदारकी पणाला लावणार आहे,तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी निवडणूक लढवित आहे असे प्रतिपादन आ.विलासराव जगताप यांनी केले.असे आव्हान प्रचार शुभारंभ प्रसंगी जगताप यांनी केले.

Rate Card

भाजपचे आमदार विलासराव जगताप यांचा खलाटी येथील श्रीलक्ष्मी दर्शन घेऊन प्रचारास शुभारंभ करण्यात आला.यावेळी भाजपाचे जि प सदस्य सरदार पाटील,कार्याध्यक्ष सुनिल पवार,पंचायत समिती सभापती सौ सुशिला तावशी,रिपाईचे संजय कांबळे,चंद्रशेख गोब्बी,कुंडलिक दुधाळ,पोपटराव पुकळे,मुरलीधर शिंगे, पंचायत समिती सदस्या सौ श्रीदेवी जावीर.शिवसेनेचे संजीव सावंत,परशूराम चव्हाणसर,बसवसेनेचे

बसवराज पाटील,रासपचे अजित पाटील,विजय ताड,आप्पा तेली, विजयराजे चव्हाण आदी मान्यवर व पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ.जगताप म्हणाले,गेल्या पाच वर्षात तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला आहे.रस्ते,सिंचन,जलसंधारणसह अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत.भाजपचे सरकार जनहिताचे आहे.तालुक्यातील उर्वरीत सिंचन योजना तसेच तालुक्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या,असेही आमदार जगताप म्हणाले.

कुंडलिक दुधाळ भाजपात

अंकलेचे माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक दुधाळ,पंचायत समिती सदस्य कुंडलिक सरगर यांनी यावेळी आमदार विलासराव जगताप यांना पांठिबा देत,प्रचारात सक्रीय झाले.

जत येथे प्रचाराचा शुभारंभानंतर विजयी खून दाखविचाना आ.विलासराव जगताप व पदाधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.