जतेत ऐतिहासिक दसरा उत्साहात

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : सालाबाद प्रमाणे जतचे डफळे राजघराण्याचे वंशज श्री.यल्लमा देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष शार्दुलराजे डफळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक दसरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.जत तालुक्याला इतिहास कालीन संदर्भ असल्याने डफळापूर, येळवी,संख,उमदी,शेगावसह अनेक गावात दसरा उत्साहात विधिवत साजरा करण्यात आला. 

जत येथील राममंदीर चौकातून मानाच्या पालखीमध्ये तलवार व पोथी ठेवून राममंदीर चौक ते धाकली वेस अशी पारंपारिक पद्धतीने वाद्याच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर राजपुरोहीत रमेश पुरोहित यांच्याहस्ते पोथी पूजन व मंत्रपठण आदी धार्मिक विधी झाल्यानंतर श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांच्या हस्ते शमीपुजन व शस्त्रपुजन करण्यात आले.उपस्थित नागरिकांनी आपट्याच्या पानाची अक्षरशः लुट करित सोने लुटण्याचा आनंद घेतला. यावेळी अँड. श्रीपाद अष्टेकर, बाळासाहेब जाधव,डाॅ.महेश भोसले, डाॅ.विजयकुमार पाटील, प्रा.चंद्रसेन मानेपाटील, मोहन मानेपाटील,गुरुनाथ बिज्जरगी,अनिल शिंदे,अरूण शिंदे, टसुरेश डफळे,गणेश सावंत,अमर जाधव,मोहन चव्हाण, पोलीस पाटील मदन पाटील, प्रा.कुमार इंगळे, सुधिर चव्हाण, पापा सनदी, कैलास गायकवाड,अशोक गायकवाड, मदन चव्हाण, राजकुमार कुलकर्णी, शब्बीर मुजावर, महादेव माळी, विश्वनाथ सावंत आदीसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जत येथे ऐतिहासिक दसऱ्यांचे शमीपुजन व शस्त्रपुजन करताना शार्दुलराजे डफळे,यावेळी उपस्थित मान्यवर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.