जतेत पाण्यात बुडून तिघाचा मुत्यू तिप्पेहळ्ळीत दोन शाळकरी मुली,सनमडीत तरूण शेतकरी बुडाला

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून झालेल्या पावसामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.या पाण्यात बुडून तिघाचा दुर्देवी मुत्यू झाल्याच्या दोन घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

तिप्पेहळ्ळी(चव्हाणवस्ती) ता.जत येथे जनावरे राकण्यासाठी गेलेल्या दोन दोन बहिणीचा नाल बंल्डिग मध्ये तर सनमडी येथे तलावातील मोटार काढण्यासाठी केलेल्या 35 वर्षीय शेतकऱ्यांचा बुडून मुत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली.सानिका रामा भिसे(वय-10),कोमल रामा भिसे(वय-7,दोघी मुळ गाव खिलारवाडी,सध्या रा.तिप्पेहळ्ळी) असे मयत बहिणीची नावे आहेत.

अधिक माहिती अशी,मयत सानिका व कोमलसह चार बहिणी तिप्पेहळ्ळी येथील चव्हाण वस्ती येथील आजोबा जगू भूंजिगा बंडगर यांच्या घरी शाळा शिकण्यासाठी राहतात.त्याचे मुळ गाव खिलारवाडी हे आहे.आई वडील गोवा येथे मजूरीचे काम करतात. सोमवारी आजोबा जंगू,आजी मंगल नवरात्रीनिमित्त जत येथील अंबाबाई देवीचे कुंड पुजण व देवीच्या दर्शनासाठी आले होते.अश्विनी,स्वप्नाली या दोन मोठ्या बहिणी जत येथे शाळेला गेल्या होत्या.सानिका व कोमल या दोघी घरी होत्या.सकाळी आकराच्या सुमारास म्हैशी हिंडविण्यासाठी घरापासून सातशे मिटरपर्यत त्या गेल्या होत्या.तेथे गेल्या दोन दिवसापुर्वीच्या झालेल्या पावसात पाण्याने भरलेल्या नालाबांधमध्ये कोमल हातपाय धुत असताना तिचा पाय घसरून ती पाण्यात पडली,तिला वाचविण्यासाठी सानिका पाण्यात गेली असता दोघीही बुडाल्या.दरम्यान आजोबाचे रेवनाळचे नातेवाईक तानाजी वाघमोडे हे नवरात्रीचे फराळ देण्यासाठी गेल्यावर हा प्रकार लक्षात आला.दोघीचे मृत्तदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Rate Card

सनमडी तलावात बुडून एका तरुणाचा  मुत्यू 

येळवी : तालुक्यातील सनमडी तलाव परिसरात दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने अनेक तलावात पाणी साचले आहे.त्यातच टोणेवाडी येथील उत्तम पांडुरंग टोणे(वय 35)हा युवक पाण्यातील वीजपंप काढत असताना,तलावात उतरला मात्र तो परत बाहेर आलाच नाही. तेेथे उपस्थितीत असणाऱ्या चंद्रकांत गणपती टोणे यांनी सदर घटनीची माहिती उमदी पोलिसांना दिली.अउमदीचे पोलीस निरीक्षक दांडगे,पोलीस हवालदार आप्पा कुंभार व हवालदार कोष्टी,पोलीस पाटील भडे  यांनी घटनास्थळी दाखल होऊन मुतदेह पाण्याबाहेर काढला.त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी, दोन मुले,दोन भाऊ असा परिवार आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.