जत | सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली : बाळासाहेब थोरात

0
Rate Card

जत,प्रतिनिधी: जतचे सगळे आमदार विधानसभेत दिसत होते,मात्र आताचे आमदार गेल्या पाच वर्षात मला विधानसभेत दिसलेच नाही,हे आश्चर्य वाटते,असा टोला कॉग्रेसचे प्रदेशध्याक्ष आ.बाळासाहेब थोरात यांनी आ.विलासराव जगताप यांना नाव न घेता लगावला.

कॉग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह सांवत यांच्या प्रचारार्थ जत येथे आयोजित सभेत थोरात बोलत होते.यावेळी कॉग्रेसचे प्रवत्ते सचिन सांवत,माजी आमदार उमाजीराव सनमडीकर,आप्पाराया बिराजदार,बाबासाहेब कोडक, नगरसेवक नाना शिंदे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.सांवत म्हणाले,जतच्या कर्नाटकच्या लगतच्या गावांना पाणी आणण्यासाठी सांवत यांची तळमळ मला आजही दिसली.कॉग्रेसचे सरकार आल्यानंतर ते पहिले काम करू असे, मी त्यांना आश्वासन दिले आहे.भाजप-शिवसेनेचे सरकार घालविण्यासाठी कॉंग्रेस राष्ट्रवादी एकजूटीने आम्ही लढत आहोत.त्यामुळे मित्र पक्ष राष्ट्रवादीच्या जतच्या नेत्यांची मित्र धर्म पाळावा.जेवढे नेते गेले तेवढे नेते उभे राहिले आहेत.सर्व रिक्त जागा भरून काढल्या आहेत.थोरात म्हणाले, भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. बरोजगारी वाढली आहे.अशा या सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे.जतच्या विकासासाठी आता विक्रमसिंह सांवत यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असेही आवाहन थोरात यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.