डॉ.रविंद्र आरळी यांचा उमेदवारी अर्ज दाखल | मोठे शक्तीप्रदर्शन

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : जत विकास आघाडीचे उमेदवार डॉ.रविंद्र आरळी यांची मोठ्या शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला.

डॉ.आरळी यांच्या हॉटेलपासून रँलीने तहसील कार्यालय येथे येत उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी माजी सभापती प्रकाश जमदाडे,राष्ट्रवादीचे नेते माजी सभापती सुरेश शिंदे,जनसुराज्यचे नेते जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील,रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे,मन्सूर खतीब, शिक्षण सभापती तम्माणगोंडा रवीपाटील,अँड.प्रभाकर जाधव, शिवाजीराव ताड,संजय तेली,अँड.सी.आर.सांगलीकर,माजी आमदार मधूकर कांबळे,रमेश पाटील,बसवराज धोडमनी,सिध्दू शिरसाड,अँड.एम.के.पुजारी,माजी उपसभापती शिवाजी शिंदे,उपनगराध्यक्ष आप्पा पवार,नगरसेवक टिमू एडके, स्वप्निल शिंदे,भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी,मच्छिंद्र वाघमोडे आदी नेते उपस्थित होते.

पुर्वाश्रमीचे भाजपचे नेते असलेले डॉ.आरळी,जमदाडे,गुड्डोडगी यांनी उमेदवारी मागूनही न मिळाल्याने बंड पुकारले आहे.त्यांच्यासह राष्ट्रवादीचे सुरेशराव शिंदे,मन्सूर खतीब,जनसुराज्यचे बसवराज पाटील,सी.आर.सांगलीकरसह मोठ्या संख्येने प्रमुख नेते येत जत तालुका विकास आघाडीची स्थापना केली आहे. त्यात डॉ.आरळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

शुक्रवारी या सर्व नेते,कार्यकर्त्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारीचे नामनिर्देशन पत्र दाखल केले.

डॉ.आरळी म्हणाले,जतच्या स्वाभिमानी जनतेच्या हितासाठी आम्ही निवडणूक रिंगणात उतरलो आहे.सिंचन योजना,उद्योग,रस्तेसह तालुक्यातील प्रंलबित प्रश्नासाठी आम्हची उमेदवारी आहे.28 वर्षापासून निष्ठेने काम करत असतानाही उमेदवारी डावलण्यात आली आहे. मात्र आम्हाला उमेदवारी नाकारण्यात आल्याने सर्वांनी एकसंग होत निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.मला भाजप,राष्ट्रवादी, जनसुराज्य सह पांठिबा दिलेल्या सर्व नेते,कार्यकर्त्यांचा मी अभारी आहे. माझी सर्वमान्य उमेदवारी असल्याने सर्व स्तरातून मदत होत आहे.

डॉ.रविंद्र आरळी यांचा उमेदवारी अर्ज मोठे शक्तीप्रदर्शन करत दाखल केला.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.