आ.विलासराव जगतापांच्या प्रचारला वेग

0

जत,प्रतिनिधी : जत विधानसभेचे भाजपचे आमदार विलासराव जगताप यांची प्रचार यंत्रणा गतीमान झाली आहे.तालुक्यातील त्यांचे समर्थक आता प्रचार यंत्रणेत उतरले आहेत.

स्व:ता आमदार जगताप बैठका,विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांच्या भेटी घेत आहेत.गत पाच वर्षात केलेल्या प्रचंड विकास कामे व देश,राज्याच्या विकासासाठी काम करत असलेल्या भाजपा सरकांरच्या विकास योजनामुळे ग्रामीण राहणीमानात कमालीचा बदल झाला आहे. ग्रामीण भाग शासनाच्या लोकहिताच्या कामामुळे देशाशीजोडला गेला आहे. 

Rate Card

तालुक्यातील जनतेला यांचा मोठा फायदा झाला आहे. गेल्या पाच वर्षात तालुक्यातील विकासासाठी मोठा निधी आणला आहे.सिंचन,रस्ते,सह विविध प्रमुख प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.उर्वरित कामे पुर्ण करण्यासाठी पुन्हा संधी द्या असे आवाहन आ.जगताप यांनी विविध ठिकाणी बैठकीत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.