जत | डॉ.रविंद्र आरळी यांना सर्वपक्षीय उमेदवारी | जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडीची स्थापना

0

जत,प्रतिनिधी : जत भाजपचे नेते डॉ.रविंद्र आरळी यांची सर्व पक्षीय उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. जत कॉंग्रेस,राष्ट्रवादी,भाजपचे बंडखोर,जनसनुराज्य,आदीच्या झालेल्या बैठकीत जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडीची स्थापना करण्यात आली. त्यात डॉ.आरळी यांची सर्वोनुमते निवड घोषणा झाली.डॉ.आरळी यांच्या घोषणेनंतर जत शहरात फटाक्याची आतषबाजी करत आंनदोत्सव साजरा करण्यात आला. शुक्रवार ता.4 रोजी विकास आघाडीच्या वतीने डॉ.आरळी यांचा शक्तीप्रदर्शनानी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

जत येथे झालेल्या बैठकीला

बालगाव मठाचे अमृतानंद स्वामीजी,  राष्ट्रवादीचे नेते माजी सभापती सुरेश शिंदे,जनसुराज्यचे नेते जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील,रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे,मन्सूर खतीब, शिक्षण सभापती तम्माणगोंडा रवीपाटील,अँड.प्रभाकर जाधव, शिवाजीराव ताड,अँड.चन्नाप्पा होर्तीकर,संजय तेली,अँड.सी.आर.सांगलीकर,माजी आमदार मधूकर कांबळे,रमेश पाटील,बसवराज धोडमनी,सिध्दू शिरसाड,अँड.एम.के.पुजारी,माजी उपसभापती शिवाजी शिंदे,उपनगराध्यक्ष आप्पा पवार,नगरसेवक टिमू एडके, स्वप्निल शिंदे,भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी,मच्छिंद्र वाघमोडे आदी नेते उपस्थित होते.

भाजपकॉग्रेसचे घोषित उमेदवार आ.विलासराव जगताप, व विक्रमसिंह सांवत यांच्या उमेदवारीला पक्षा अतर्गंत मोठा विरोध होती.उमेदवारी बदलून द्यावी अशी मागणी होती.मात्र दोन्ही पक्षांनी दखल घेतली नाही.पक्षा अतर्गंत विरोध होता त्याचा विस्फोट झाला.

लादण्यात आलेल्या उमेदवारांला विरोध करण्यासाठी प्रमुख नेत्यांनी एकत्र येत जत तालुका विकास आघाडीची स्थापना करण्यात आली.दुपारी बारा वाजल्यापासून आरळी शैक्षणिक उमेदवारी संदर्भात प्रमुख नेत्यांची खलबते सुरू होती.सर्वांनूमते डॉ.रविंद्र आरळी यांच्या नावावर एकमत झाले.

जत तालुक्यात 1995 साली विकास आघाडीची स्थापना झाली होती.तत्कालीन उमेदवारीला विरोध करत राजकीय अंसतोषाचा उद्रेग झाला होता.त्यांची पुर्नावर्ती 25 वर्षानंतर झाली.

भाजपपुढे भाजपच्या उमेदवारांचे आवाहन उभे झाले

जत तालुक्यात भाजपचे उमेदवार आ.विलासराव जगताप यांना प्रथमपासून विरोध होता.तरीही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली.त्यामुळे भाजपचे ताकतवान नेते डॉ.रविंद्र आरळी,रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे, शिक्षण सभापती तम्माणगोंडा रवीपाटील, शिवाजीराव ताड,चंद्रकांत गुड्डोडगी आदी नेते नाराज झाले होते.त्यांनी पुढाकार घेत डॉ.रविंद्र आरळी यांच्या रुपाने तिसरा पर्याय उभा केला आहे.त्यामुळेभाजपपुढे भाजपच्या उमेदवारांचे आवाहन उभे ठाकले आहे.

Rate Card

कॉग्रेसलाही फटका बसणार 

 कॉग्रेसकडून जिल्हा बँक संचालक विक्रमसिंह सांवत यांना उमेदवारी घोषित झाली आहे.मात्र त्यावर राष्ट्रवादी,जनसुराज्य नाराज होते.त्यामुळे सांवतच्या विरोध होता.मात्र पक्षाने  उमेदवारी लादल्याने राष्ट्रवादी व जनसुराज्यच्या नेत्यांनी निर्णय घेत विकास आघाडी स्थापना करण्यात पुढाकार घेतला आहे.

एकसंघ लढणार

बैठकीला उपस्थित सर्व नेत्यांनी एकसंघ लढण्याची शपथ घेतली आहे.आपणच उमेदवार आहे.अशा पध्दतीने प्रचार यंत्रणा राबविण्यात येणार आहे.

विजय मिळवणार

भाजपकडे आम्ही उमेदवार बदलाची मागणी केली होती.आमची पक्षांने दखल घेतली नाही.त्यामुळे पक्षाने लादलेल्या उमेदवारीला विरोध करत विकास आघाडी स्थापन करत तिसरा पर्याय आम्ही मतदारासमोर उभा केला आहे.मी पुर्ण ताकतीने उतरलो आहे.या आघाडीतील सर्व उमेदवार आहेत.त्यामुळे मी विजय मिळवणारच असा विश्वास डॉ.आरळी यांनी व्यक्त केले.

यातील फोटो कट करून बसवा  एकनंबर चांगली बातमी करा

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.