महिला बलात्कार प्रकरण : तपास लागेना

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : जत-येळवी रोडवरील बिसल सिद्राया मंदिराजवळ चाकूचा धाक दाखवून विधवा महिलेवर बलात्कार प्रकरणाचा आठवा दिवस पुर्ण झाले,तरीही तपास लागत नसल्याने पोलीस हातबल झाले आहेत.घटना घडल्यापासून पोलीसांनी आरोपीच्या शोधासाठी जंग पछाडले आहे.आता पवनचक्कीवर असणाऱ्या परप्रांत्रिय कर्मचाऱ्यावर पोलीसांनी मोर्चा वळविला आहे.

गुरूवार ता.26 रोजी निगडी येथील मुसलमान वस्ती येथून जतला येणाऱ्या महिलेला चारचाकी गाडीतून लिप्ट देण्याच्या बहाण्याने बिसल सिद्राया मंदिरा पाठीमागे पवनचक्कीकडे जाणाऱ्या रस्त्यावर निर्जनस्थळी नेहत गाडीत बलात्कार करून 50 हजाराचे दागिणे लंपास केले होते.घटना घडून आज आठ दिवसाचा कालावधी संपत आला तरीही आरोपीचा शोध लागत नसल्याने पोलीस यंत्रणाही चक्रावली आहे.अशा अन्य दोन घटना घडल्याने पोलीसांची जबाबदारी वाढली आहे.त्यामुळे अप्पर अधिक्षक मनिषा डुबुले गेल्या आठ दिवसापासून तपासासाठी जतेत तळ ठोकून आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली जत तालुक्यासह सांगोला,मंगळवेढा कर्नाटकातील सीमावर्ती भागात पोलीस पथकाकडून शोध घेण्यात आला. मात्र धागेदोरे हाती न लागल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या पवनचक्कीवरील परप्रांत्रिय कर्मचारी तपास यंत्रणेच्या केंद्रस्थांनी आले आहेत.दरम्यान वळसंग रोडवरील घटनाही तशाच पध्दतीने असल्याने दोन्ही घटनाचा तपास सुरू आहे.

दरम्यान आठ दिवसापासून तपास न लागल्याने पोलीस यंत्रणेकडून पुढची दिशा काय असणार याकडे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.