पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही | आ.जगताप,सांवत,जमदाडे,आरळींनी नामनिर्देशन पत्राचे अर्ज घेतले

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : जत विधासभा निवडणूकीचा बिगुल वाजला असून पहिल्या दिवशी 14 नामनिर्देशनपत्राचे अर्ज इच्छुक उमेदवारांच्या इंच्छूकांनी नेहले आहेत. जत तहसील कार्यालयातील निवडणूक कक्षात उमेदवारी नामनिर्देशन पत्राचे अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी भाजपकडून इंच्छूक असलेले विद्यमान आमदार विलासराव जगताप यांनी दोन,रविंद्र आरळी,प्रकाश जमदाडे, यांनी प्रत्येकी एक नामनिर्देशन पत्राचे अर्ज नेहले आहेत.कॉग्रेसचे विक्रम सांवत एक, राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले रमेश पाटील,त्याशिवाय शिवसेना नागनाथ मोटे, दिनकर पंतगेसह 15 अर्ज नेहले आहेत.

जत विधानसभेची अजून कोणत्याही पक्षाची उमेदवारी घोषित झालेली नाही.भाजपकडून सर्वाधिक इंच्छूकांची संख्या आहे.त्याशिवाय कॉग्रेस,राष्ट्रवादी,वंचित आघाडी,शिवसेना,अपक्ष उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत.ता.27 संप्टेबर पासून उमेदवार नामनिदर्शेन पत्राचे अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत.नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या आठ दिवसात शनिवार, रवीवार,महात्मा गांधी जयंती अशा तीन सुट्या आहेत.त्यामुळे उमेदवारांना पाच दिवस मिळणार आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रंशात आवटे, तहसीलदार सचिन पाटील हे निवडणूक कक्षात नियोजन करत आहेत.नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया जत तहसील कार्यालयात ठेवण्यात आली आहे.

पहिल्या दिवशी अर्ज नेहलेले उमेदवार महादेव मुरग्याप्पा हुचगोंड,सुनिल सिध्दू दलवाई,महादेव हरिचंद्र कांबळे,मनोज जगताप,शौकत दस्तगीर शेख,मोहन संभाजी भोसले असे आहेत.दरम्यान पितृपक्ष सुरू असल्याने विधानसभा निवडणूकीचे नामनिर्देशन पत्र पितृपक्षानंतर भरली जातील असे सांगण्यात येत आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.