पोलीस रेकार्डवरील 64 गुन्हेगारांवर कारवाई | जत पोलीसाची यादी तयार

0
Rate Card

 कायद्या सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांच्या मुसक्या आवळणार

जत,प्रतिनिधी : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जत पोलीस ठाण्यात 2 पेक्षा जादा गुन्हे दाखल 64 गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई होणार हे निश्चित झाले आहे.विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर आदर्श अचारसंहीता सुरू असून सदरची

निवडणूक ही शांततेत पार पाडण्यासाठी जत पोलीस सतर्क झाले आहेत.जत पोलीस ठाणेकडे 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची यादी तयार केलेली आहे. सदर गुन्हेगारांकडून निवडणूक कालावधीत कोणताही अनुचीत प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये तसेच आदर्श अचारसंहीतेचा भंग होवू नये यासाठी पोलीस ठाणेकडील रेकॉर्डवरील या गुन्हेगारवर ठोस अशी प्रतिबंधात्मक कारवाई करणेत येणार आहे. अशा प्रकारच्या एकूण 64 गुन्हेगारांची यादी

तयार केली आहे.तसेच विधानसभा निवडणूक 2019 ही शांततेत पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जत विभागातील

5 अधिकारी,50 पोलीस कर्मचारी,30 होमगार्ड यांचेसह जत शहरात रूटमार्च घेण्यात आला.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.