महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची | वाळेखिंडीच्या लकडे पेढे लघु उद्योगाला भेट

0

शेगांव,वार्ताहर : जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आज वाळेखिंडी ता.जत येथील प्रसिद्ध लकडे पेढे या लघुउद्योग समूहाला भेट देऊन यासंदर्भात माहिती घेतली.  जत शहरापासून उत्तरेला सुमारे 25 कि. मी अंतरावर असलेल्या प्रसिद्ध अशा वाळेखिंडी येथील लकडे पेढे हा यशस्वी उद्योग सुरू असून याचा अभ्यास व अनुभव घेण्यासाठी महाविद्यालयाच्या 24 विद्यार्थी व चार प्राध्यापकांनी भेट दिली.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जत व जत परिसरातील उद्योग व उद्योगपती यांची ओळख निर्माण व्हावी हा या भेटीमागचा हेतु होता. यावेळी बोलताना लकडे उद्योग समुहाचे प्रमुख शिवानंद लकडे म्हणाले की “लकडे पेढे हे जत आणि जत परिसरात अतिशय प्रसिद्ध बेकरीतील ब्रँड बनला आहे.या उद्योगाला जवळपास 50 वर्षाची परंपरा आहे.  आमच्या तिन पिढ्या या उद्योगात आहेत.

Rate Card

राजे रामराव महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची वाळेखिंडीतील लकडे पेढे लघु उद्योगाला भेट दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.