जतेत वैद्यकीय व्यवसायिकांला शिवीगाळ : कडक कारवाईची मागणी

0

जत : येथील वैधकीय व्यवसाईक डाॅ. सुनिल वनकुद्रे यांच्या हाॅस्पीटल मध्ये नातवाईकासह घुसून डाॅक्टर व कर्मचाऱ्यांना शिविगाळ करत मारहाण करून दारूच्या नशेत गोंधळ घालणारे सुभाष कोळी यांच्यावर मेडिकल प्रोटेक्शन अँक्टखाली कडक कारवाई करावी अशी मागणी येथील नॅशनल इंटरग्रेटेड मेडिकल असोसिएशन (इंडिया) जत शाखेच्या वतीने तहसीलदार जत यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. 

त्यानी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जत शहरातील गांधी चौक येथील डाॅ.सुनिल वनकुद्रे यांच्या सोमेश्र्वर क्लिनिक मध्ये दिनांक 22 नोव्हेबंर रोजी सायंकाळी 6 वाजता जत येथील रहिवासी सुभाष कोळी हे त्यांच्या उपचाराकरिता आले होते.मात्र ते दारूच्या नशेत होते.दरम्यान उपचार सुरु असताना त्याने व त्यांचे नातेवाईकांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत गैरवर्तन केले. त्याचप्रमाणे क्लिनिक मधील सहकारी कर्मचारी यांना शिविगाळ व मारहाण केली. दवाखान्यात तोडफोड करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.मंगळवारी सकाळी या घटनेचा जत मधील सर्व डाॅक्टरानी निषेध व्यक्त केला. तसेच या अन्यायाविरूध्द जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डाॅ.महेश पट्टणशेट्टी,डाॅ.प्रदिप शिंदे, डाॅ.दिपक जेऊर, डाॅ. सौ.स्वाती माळी, डाॅ.लोकेश लोणी, डाॅ.विवेकानंद राऊत, डाॅ. सतीश मोगली,डाॅ.कैलास सनमडीकर,डाॅ.विजय पाटील, डाॅ.मदन बोर्गीकर,डाॅ. देवानंद वाघ,डाॅ.पराग पवार आदि डाॅक्टर्स उपस्थित होते. निवासी तहसीलदार जी.एल .शेट्टयापागोळ यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.

Rate Card

जत येथील उपचार करणाऱ्या डॉक्टरांना शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या रुग्णांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.