शिक्षक बँकेचा व्याजदर दहा टक्क्यापर्यत आणू | विश्वनाथ मिरजकर

जत,प्रतिनिधी : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचा व्याजदर दहा टक्क्यापर्यंत खाली आणण्याचा प्रयत्न करून, जत तालुक्यातील महिला सभासदांना बँकेच्या निवडणुकीत प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय जत तालुक्यासाठी जास्तीत जास्त जागा देऊन येथील शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती शिक्षक समितीचे नेते विश्वनाथ मिरजकर यांनी येथे पत्रकार बैठकीत बोलताना दिली.शिक्षक समिती सामाजिक बांधिलकी ठेवून चांगले काम करत आहे. या कामातूनच आदर्श शिक्षक निर्माण होत आहेत. यापुढील वीस ते
प्रयत्न करत आहोत. शिक्षक समितीचे सभासद संघटना, बँक व शाळा सांभाळून एकत्रितपणे काम करत आहेत. त्यामुळे समितीचे सभासद बँकेचे कामकाज चांगल्या पद्धतीने काटक सर करुन चालवत आहेत.सांगली शिक्षक बँकेचे आदर्शवत कामकाज पाहून विदर्भ व मराठवाड्यातील शिक्षकांनी बँकेच्या शाखा तेथे सुरु कराव्यात, अशी आग्रहाची मागणी केली आहे.यावेळी शिक्षक बँकेचे अध्यक्ष हरिभाऊ गावडे, उपाध्यक्ष राजाराम सावंत, दीपक कोळी, दयानंद मोरे,आप्पासाहेब सौदागर,लहू वाघमोडे,धरेप्पा कट्टीमनी,उत्तम पाटील, रमेश साबळे,सुरेश पाटील, माणिक पाटील,सतीश पाटील,धानाप्पा माळी,आर. आर. सावंत, किसनराव पाटील, शशिकांत भागवत,मल्लिकार्जुन बालगाव,किरणराव गायकवाड आदी उपस्थित होते.पंचवीस वर्षे विरोधकांकडे बँक जाणार नाही, अशी ग्वाही देऊन विश्वनाथ मिरजकर पुढे म्हणाले,विरोधकांत फूट पडली आहे. त्यामुळे नवा व जुना वाद न ठेवता आम्ही सर्वांना सामावून घेऊन न्याय देण्याचा शासन नवीन शिक्षक भरती करत नाही. दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे बँकेची सभासद संख्या घटत आहे.याला पर्याय म्हणून आम्ही इतर जिल्ह्यातील
सभासद करून घेतले आहेत. बँकेच्या हितासाठी हा घेतलेला निर्णय आहे, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.
जत येथे आयोजित कार्यक्रमात थोरात गटातून समितीत प्रवेश केलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.