एकुंडीतून आ.विलासराव जगताप यांनाच मताधिक्य देणार ; बसवराज पाटील

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : एकुंडी(ता.जत) येथे जत तालुक्याचे आमदार विलासराव जगताप यांचा संपर्क दौरा व पदाधिकारी जनतेशी संवाद मेळावा झाला.

यावेळी आ.जगताप यांचा सत्कार एकुंडी माजी सैनिक मलगोंडा कोट्टलगी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी

 जत तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष तथा संरपच बसवराज पाटील म्हणाले, काश्मीर मधील 370 कलम रद्द केल्याबद्दल पंतप्रधान मोदी सरकारचे, थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस सरकारचे व जिरग्याळ तलाव, एकुंडी बसवेश्वर रस्ता काँक्रीटीकरण व एकुंडी ते अनंतपूर रस्ता डांबरीकरण आमदार फंडातून मंजूर केल्याबद्दल आ.जगताप यांचे आभार मानले.जनतेच्या विकासात्मक कामांना प्राधान्य देणाऱ्या कतृव्यदक्ष आ.जगताप यांना एंकुडीतून मताधिक्य देऊ असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

 यावेळी जि.प.सदस्य सरदार पाटील,सुनिल पवार,पं.स.सदस्य रामण्णा जीवण्णवर,आप्पासाहेब पाटील, शिवाप्पा तांवशी, मेजर मलगोंडा कोट्टलगी, रावसाहेब नाईक, महानिंग म्हेत्रे, बाबासो पाटील,  ग्रा.पं.सदस्य सागर लठ्ठी, सिद्राम कोरे, सुरेश महाराज,डॉ.रवि शेगावे, इराप्पा चौगुले,सदाशिव शेगावे, हणमंत कांबळे, सुरेश हेळकर, शिवानंद शेगावे, चिदानंद शेगावे,अनिल गुड्डोडगी,महादेव गुड्डोडगी,बशेट्टी कोट्टलगी,बिसलाप्पा वळसंग,शंकर वळसंग,शशिकांत नाईक, संजय नाईक,वाल्मिक कोळी,बसवराज म्हेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.