“आदर्श शिक्षक” पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन : डॉ.रविंद्र आरळी

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक तसेच वैद्यकीय क्षेत्रात समाजाभिमुख काम करणाऱ्या लायन्स क्लब जतच्या वतिने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचे समजल्या जाणाऱ्या “आदर्श शिक्षक” पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन लायन्स क्लबचे

संस्थापक डॉ.रविंद्र आरळी व अध्यक्ष दिनकर पतंगे यांनी पत्रकार बैठकीत केले.

यावेळी बोलताना डॉ.आरळी म्हणाले, लायन्स क्लबच्या स्थापने पासून गेली 15 वर्षे शिक्षकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने शबासकीची थाप त्यांच्या पाठीवर देण्याकरीता हे पुरस्कार वितरित करण्यात येतात. दरवर्षा प्रमाणे यंदा ही सप्टेंबरच्या दि.25 अखेर पर्यंत इच्छुक पात्र शिक्षकांनी जत लायन्स क्लबचे सचिव प्रशांत अंकलगी,उमा चॅरिटेबल ट्रस्ट, लायन्स लायन्स क्लबच्या कार्यालयात सविस्तर माहिती सह प्रस्ताव सादर करावेत.प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा शैक्षणिक क्षेत्रात  उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांकडून प्रस्ताव मागवून संबंधित शाळेची गुणवत्ता,शैक्षणिक दर्जा याच बरोबर शिक्षकांची शेक्षणिक पात्रता,त्यांचे अध्यापन कौशल्य तसेच शैक्षणिक मूल्यमापन व शिक्षण सेवेतील त्यांच्या प्रभावी कामाचा लेखजोका तपासून  पुरस्कारासाठी योग्य अशा शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.