जत | नेतृत्व बदल झाल्यास अँड.प्रभाकर जाधव मुख्य दावेदार |

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : जत विधानसभेसाठी  तालुक्यात भाजपात उमेदवारीचा मोठा संशयकल्लोळ तयार झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे पाणीदार नेते अँड.प्रभाकर जाधव हे नेतृत्व बदल झाल्यास भाजपचे मुख्य दावेदार ठरणार हे जवळपास निश्चित झाले आहे.तालुक्यातील जनतेतून त्यांना मोठा पांठिबा मिळत आहे.निवडणूक समोर आल्यानंतर जत विधानसभा मतदार संघाच्या प्रश्नांची जाणीव झालेले अनेकजण विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. मात्र म्हैसाळच्या पाण्यासाठी पाच दिवस उपोषण करणारे सामाजिक, शैक्षणिक कामातून गेली 15 वर्षे कार्यरत असणाऱ्या अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे अँड. प्रभाकर जाधव यांनी केलेल्या कामाची दखल भाजपला घ्यावी लागेल,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.श्री.जाधव यांनीही निवडणूक लढवण्याचीतयारी केली असून कोणतंही पद नसताना,कोणताही बडेजाव न करता त्यांनी केलेली कामे महत्वाची असून कामाला महत्त्व देणारा भाजप यासर्वांचा विचार करूनच उमेदवारीचा विचार करेल, असा विश्वास जाधव यांचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.जत विधानसभा निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.विद्यमान आमदारविलासराव जिगताप यांनाच पक्ष पुन्हा संधी देणार की नवा चेहरा निवडणार, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.जतच्या जनतेतूनही आता नवा, तरुण चेहरा भाजपने द्यावा,अशी मागणी होतआहे. सांगली, मिरजेत भाजपचे उमेदवार कधीच नक्की झाले आहेत. मात्र जतचे भाजपचे विद्यमान आमदार जगताप यांच्या उमेदवारीबाबत संशय कल्लोळ आहे. त्यामुळे भाजपमधीलच अनेक जणांनी तयारी सुरू केली आहे.केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत काहींनी काम करण्याचा वजनतेसमोर प्रदर्शित करण्याचा अँड.प्रभाकर जाधव प्रयत्न गेल्या काही दिवसांत चालविला आहे. विधानसभा निवडणूक लढवयाचे धोरण नसते, तर अशा लोकांनी कामं केली असता का, अशी शंका निर्माण होत आहे.अँड.प्रभाकर जाधव यांनी हे मात्र गेली पंधरा वर्षे तालुक्यात विविध कामांच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत.त्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.मागील वर्षीही श्री. जाधव यांनी विधानसभेसाठी अर्ज भरला होता. मात्र आमदार विलासराव जगताप यांना पक्षाने उमेदवारी दिली. श्री.जगताप यांनी विनंती केली आणि श्री. जाधव यांनी थांबण्याचा निर्णय घेतला. भाजपमधून निवडून आलेल्या प्रकाश शेंडगेंच्या विजयासाठी प्रयत्न केले होते. पूर्ण ताकदीने भाजपचे काम केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणूकांसह लोकसभा निवडणुकीतही पक्षाचे काम जोमाने केले. एकूणच, गेली अनेक दिवस भाजपचे काम निष्ठेने करणारे नेतृत्व म्हणून श्री.जाधव यांची ओळख आहे. या तालुक्यातील अनेक प्रश्नांसाठी त्यांनी सतत लढा दिला आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी पहिल्यांदा जत तालुक्यात आणण्यासाठी श्री.जाधव यांनी मोठे प्रयत्न केले. काही वेळा पदरमोड, तर काही वेळा लोकवर्गणीतून योजनेसाठी काम केले. तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्याआग्रहामुळे प्रांत कार्यालय कवठेमहांकाळला करण्याचा घाट घालण्यात आला. मात्र श्री.जाधवयांनी लढा उभारला, आंदोलनं केली आणि प्रांत कार्यालय जतलाच करण्यास भाग पाडले.आज त्यामुळे तालुक्यातील जनतेची मोठी सोय झाली आहे. शैक्षणिकदृष्ट्या तालुका प्रगत व्हावा,या उद्देशाने शिक्षण क्षेत्राकडे सतत लक्ष ठेवले.चांगल्या शिक्षकांना सर्वाधिक संख्येने पुरस्कार देत शैक्षणिक प्रगतीस हातभार लावत आहेत.त्याशिवाय त्यांच्या पत्नी स्नेहलता जाधव जिल्हा परिषद सदस्या आहेत.त्यामाध्यमातून मोठ्या संख्येने विकास कामे केली आहेत.केली. जिल्ह्यात पहिल्यांदाच महिलांच्या कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्र केसरी स्पर्धा श्री. जाधव यांच्या ‘पुढाकाराने जतला झाल्या. 65 गावांसह जतला मुबलक पाणी मिळावे हा संकल्प आहे.तालुक्यातील 65 गावांचा पाण्याचा मोठा प्रश्न आहे.लवादाच्या निर्णयाप्रमाणे आणखी 15 टीएमसी पाणी मिळणार आहे. त्या माध्यमातून जतसह सांगोला, पलूस व विटा तालुक्यास पाणी पुरेसे मिळणार आहे.तालुक्यातील 65 नव्हे, तर सर्व गावांना मुबलक पाणी मिळू शकते. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून या गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्याचा प्रयत्न केला असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले.स्पर्धा परीक्षा केंद्र, तयारीसाठी प्रयत्न जत तालुक्याची शैक्षणिक प्रगती होऊन भावी पिढी सक्षम व उचशिक्षित व्हावी, यासाठी श्री.जाधव प्रयत्नशिल आहेत.भविष्यात सर्व सुविधायुक्त,स्पर्धा परीक्षा केंद्र,अभ्यासिका,लायब्ररी सुरू करण्याचा निर्णय जाधव यांनी घेतला.असून त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू केले आहेत.जतच्या प्रत्येक प्रश्नासाठी लढा दिला.प्रत्येक प्रश्नासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे काम श्री.जाधव यांनी सतत केले आहे. जत तालुक्यावर अन्याय होत असताना प्रत्येक ठिकाणी धाव घेतली आहे.एकूणच, केवळ निवडणुकांपुरतं विकासाचं गाणं न वाजवता तालुक्याच्या सक्षम व शाश्वत विकासाचे स्वप्न घेऊन काम करीत असणाऱ्या जाधव यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे.

जत कारखाना विक्री चुकीचीजतच्या विकासात मोठं महत्त्व असणाऱ्या साखर कारखान्याची जबाबदारी घेऊन तो सुरू केला. मात्र स्थानिक राजकीय कुरघोड्यांमधून तो चुकीच्या पध्दतीने विकला गेला.राज्य  बँकेने या कारखान्याची केलेली विक्री चुकीची आहे.त्याबाबत सर्व ती कायदेशीर तयारी केली आहे.लवकरच त्याबाबत मोहीम उघडणार असून हा कारखाना परत सभासदांच्या मालकीचा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कारखाना कोणी विकत घेतला, यापेक्षा चुकीच्या पध्दतीने विकला, हे महापाप असून आपण त्यांचा सोक्षमोक्ष लावू,असा इशारा श्री.जाधव यांनी दिला आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.