इच्छाशक्तीचा अभावामुळे विकास खुंटला | विक्रम सांवत यांचे युवा संवाद कार्यक्रमात प्रतिपादन : युवकांनी पुढे यावे

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : तालुक्यावर निसर्गाची अवकृपा राहिल्याने येथील शेती, पिण्याच्या पाण्याचा व रोजगाराबरोबर युवकांचे प्रश्न बिकट आहेत. तसेच तालुक्यात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यानेही

म्हणावा असा विकास साधता आला नाही. त्यामुळे तालुक्याच्या विकासात युवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आपल्या गावातील प्रश्नांसाठी एकत्र येऊन लढा उभा करा, असे आवाहन काँग्रेस नेते विक्रम सावंत यांनी केले.जत शहरातील डफळे राजवाड्याच्या समोर तालुका युवक काँग्रेसतर्फे युवा संवाद कार्यक्रम

झाला. त्यावेळी ते बोलत होते.सूत्रसंचालन राजेंद्र माने यांनी केले.

जतच्या इतिहासाची साक्ष देणारा डफळे राजवाडा म्युझियम स्वरूपात पाहण्यासाठी उपलब्ध व्हावा,असा प्रश्न काही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.यावर विक्रम सांवत म्हणाले,डॉ.पतंगराव कदम

यांच्या माध्यमातून वन विभागाच्या माध्यमातून सात कोटी रुपयांचा निधी शहरातील अंबाबाई मंदिर पर्यटन क्षेत्र विकासासाठी मिळाला.यानंतर या शासनाने शहराच्या विकासासाठी कोणताच निर्णय घेतला नाही. तर डफळे संस्थान ही वैयक्तिक मालमत्ता आहे.त्याच्यावर आपला अधिकार नाही.

मात्र,आपण संस्थानकडे विनंती करून ती ऐतिहासिक वास्तू युवकांना पाहण्यासाठी खुली करण्याचा प्रयत्न

करू असेही यावेळी सांवत यांनी सांगितले.यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग,नगरसेवक भूपेंद्र कांबळे, माजी नगरसेवक सुजय ऊर्फ नाना शिंदे,निलेश बामणे,सलीम पाच्छापुरे,युवकचे तालुकाध्यक्ष विकास माने,उपाध्यक्ष अकाश बनसोडे, बंडू शेख,

सुमित जगधने,आदींसह युवक मोठ्या

संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.