पशुसंवर्धन मंत्री ना.महादेव जानकर शनिवारी जत दौऱ्यावर

0

ना.महादेव जानकर साठी इमेज परिणाम

Rate Card

जत,प्रतिनिधी : राष्ट्रीय समाज पक्ष जत विधानसभा क्षेत्र आयोजित भव्य कार्यकर्ता मेळावा निमित्ताने शनिवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जत शहरांमध्ये कार्यकर्ता मेळावा संपन्न होणार आहे. 

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून रासपचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री ना. महादेवजी जानकर व रासपचे महासचिव तथा शेळी-मेंढी व उद्योजकता विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. बाळासाहेब दोडतले यांच्यासहित रासपचे प्रदेश पदाधिकारी यांच्या उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम हा सोमवार 23 सप्टेंबरला होणार होता परंतु महायुतीतील घटक पक्षांची जागावाटपाची बैठक असल्याने या कार्यक्रमात बदल करून शनिवारी 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जत शहरांमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती रासपच्या माजी जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील, जिल्हाध्यक्ष मारुती सरगर, तालुकाध्यक्ष किसन टेंगले व शहराध्यक्ष भूषण काळगी यांनी दिली. तरी सदर मेळाव्याला तालुक्यातून रासप कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान त्यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.