जत | वाहतूक शिस्तच्या नावाखाली वाहनधारकाची लूट | लाखोची माया गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी मागणी

0जत,प्रतिनिधी :  शिस्तबंध्द, सुरक्षीत वाहतूक होण्यासाठी चालू केलेल्या मोहिमेला उमदी,जत पोलिस कलंकित करत आहेत. हप्तेबाजीने सुरू असलेल़्या अवैध प्रवाशी वाहतूकीकडे कधीच न बघितलेल्या उमदी,जत पोलिसांना एकादी हप्ता न देणारी गाडी मृगजळ ठरत आहे. गाडीत चार माणसे व मालकीची गाडी असलीतरी तपासणी करणाऱ्या पोलिसाना न पावती करता एकतर पाचशेची पत्ती द्यावी लागते,नाहीतर याला विरोध केला तर दोन ते पाच हाजार रूपयाची खरी पावती वाहनधारकावर लादली जात असल्याचे आरोप वाहनचालकातून होत आहेत. सर्वच अवैध धंदे राजरोसपणे सुरू असताना मुख्य मार्गावर धावणाऱ्या सर्वच गाड्या अडवून तपासणीच्या नावावर वाहनधारकाची लूट सुरू आहे. दिवसभरात खऱ्या पावत्या किती होतात. हा संशोधनाचा विषय आहे. दुसरीकडे या कामगिरीवर असणाऱ्यांची मात्र चंगळ होत असल्याची चर्चा आहे. यातून जमविलेल्या काळा मायेतून अनेकांनी लाखोची माया गोळा केल्याची चर्चा आहे. साध्या पोलिसाची हि स्थिती आहे. खरचं पोलिस वाहतूकीला शिस्त लावायचे काम करत असतीलतर त्यांच्या समोरून गाडीच्या भवती लटकून प्रवाशी वाहतूक करणाऱ्या खाजगी गाड्या त्यांच्या नजरेला दिसत नाहीत हे विशेष.. अवैध वाहतूक करणाऱ्या अनेक गाड्याच्या आरटीओ नोंदणी,विमा नाहीत.अनेक वडाप करणाऱ्या गाड्या कालबाह्य झाल्या आहेत. त्या किती व कधी प्रवाशाचा जिव घेतील यांचा नेम नाही. मात्र याला वाहतूकीची शिस्त लावण्याची गरज पोलिसांना वाटत नाही. अनेक अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावरील चालक मद्यधुंद अवस्थेत असतानाही हे पोलिस कोणत्याही दंड करत नाहीत. त्यांना मासिक मलईने त्यांच्यासाठी हिरवा गलीचा अंतरला आहे.

Rate Card

जत – बिंळूर मार्गावर दिवसाढवळ्या अशी वाहतूक सुरू असते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.