गावात झिरो तलाठी,शहरात ऑपरेटरकडून शेतकऱ्यांची लुट | कारवाईसाठी कॉग्रेस तालुकाध्यक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात तलाठ्यांनी नेमलेल्या झिरो उमेदवारांकडून शेतकऱ्यांची लुट सुरू आहे,ती तातडीने थांबवावी अशी मागणी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.विस्तारांने मोठ्या असलेल्या तालुक्यात मुळात तलाठ्याची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत.त्यामुळे एका तलाठ्याकडे अनेक गावांचा पदभार आहे.ते नेमणूकीच्या कोणत्याही गावात जात नाही.प्रत्येक गावात तेथील काम करण्यासाठी उमेदवारांची नेमणूक केली आहे. ते उमेदवार शेतकऱ्यांनी उध्दट वागतात.सातबारा,आठ अ सारखे दाखले काढण्यासाठी जादा रक्कमेची मागणी करतात.दुसरीकडे शहरात ठिय्या मांडलेल्या आण्णासाहेबांनी ऑनलाइन सातबारा काढण्यासाठी ऑपरेटर नेमले आहेत.ते तर मन मानेल अशी लुट करत आहेत.अनेकवेळा विज पुरवठा खंडीत झाल्यास काम थांबते,त्यामुळे शेतकऱ्यांना हेलपाटे घालावे लागत आहेत.हा सर्व कारभार प्रांताधिकारी,तहसीलदार यांच्या कानावरून असूनही ते कारवाई करत नाहीत हे आश्चर्य वाटते असेही बिराजदार यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.