जतेत युक्तीवर शिवसेनेची भूमिका अवलंबून

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात शिवसेनेची ताकत मर्यादित आहे.सत्तेतील पक्ष असतानाही शिवसेनेची वाढ झालेली नाही.वरिष्ठ नेत्याच्या दुर्लक्षानंतरही काही मोजक्या कार्यकर्त्यांनी तालुक्यात शिवसेना जीवंत ठेवण्याचे काम केले आहे.मात्र तालुक्यात प्रभाव पडेल अशी ताकत वाढविण्याची गरज आहे. आता जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजीवकुमार सांवत यांच्या प्रवेशानंतर तालुक्यात शिवसेनेला गतवैभव प्राप्त होण्याची अपेक्षा आहे.मात्र भाजप शिवसेना युक्तीवर येथील नेत्याचे भवितव्य आवलबूंन आहे.भाजपबरोबर युक्ती झाल्यास शिवसेनेला भाजपचा प्रचार करावा लागणार आहे.
तालुक्यातील शिवसेनेचे काम अंकुश हुवाळे, दिनकर पतंगे, विजयराजे चव्हाण, बंटी दुधाळ इत्यादी मोजकेच कार्यकर्ते पहाताना दिसत आहेत. तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीकडे शिवसेना सत्ताधारी पक्ष असतानाही गांभीर्याने पहात नसल्याने तालुक्यातील जनतेचा या पक्षावर रोष दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष पद या पक्षाकडे असतानाही तालुक्यातील म्हैशाळ योजननेचे कामाकडे दुर्लक्ष होत आहे.जत पूर्व भागातील 64 गावातील
पिण्यासह शेतीच्या पाण्याची मोठी समस्या आहे.सिंचन योजना राबवावी
म्हणून आंदोलने झाली.त्यात आजही यश येताना दिसत नाही.शिवसेनेकडूनही या पाणी योजनेबाबतही ठोस कारवाई झाली नाही.त्यामुळे पक्षाचे जनमत आजही मर्यादित राहिले आहे.कार्यकर्त्यांना बंळ देणारा पक्ष असतानाही म्हणावे तसे कार्यकर्ते वाढले नाही.किंबहुना वरिष्ठ पातळीवरील नेत्याकडून तसे प्रयत्न झाले नसल्याची खंत आहे.आता निवडणूकीच्या तोंडावर पक्षाची भूमिका स्पष्ट नसल्याने अडचणी आहेत.
शिवसेनेतून माजी सेवानिवृत्त कृषी अधिकारी दिनकर पतंगे, शिवसेना तालुकाध्यक्ष अंकुश हुवाळे, नुकतेच विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेले जि.प.चे माजी कृषी सभापती संजय सावंत हे इच्छुक आहेत.मात्र राज्यस्तरावर भाजप शिवसेना युती झाली तर यांची काय भूमिका असणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे.शिवसेनाचा जनाधार वाढण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ पातळीवरून मदत मिळणे गरज आहे. एकेकाळी तालुक्यातील दोन नंबरची मते घेणाऱ्या या पक्षाला पुन्हा उभारी घेण्याची संधी तालुक्यात आहे. आजही शिवसेनेला माननारा मोठा वर्ग तालुक्यात आहे.त्यांना विश्वास वाटेल अशी वाटचाल पक्ष नेतृत्वाकडून होणे गरजेचे आहे.
