गुंड सोनुरेला अटक करा,अन्यथा बंदचा इशारा | व्यापारी असोसिएशनचे पोलिसांना निवेदन

जत,वार्ताहर : जतेतील व्यापाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुंड रोहित सोनुरे ला त्वरित अटक करा व्यापारी असोसिएशनची मागणी लेखी निवेदनाद्वारे पोलीसाकडे केली.
निवेदनात म्हटले आहे की 11/9/19 रोजी गुंड रोहित सोनुरे याने सायंकाळच्या दरम्यान हातात कोयता घेऊन जत शहरातील शिवाजी पेठ व सोलनकर चौक येथील दुकानाची नासधूस करत शिवाजी पेठेतील व्यापारी सचिन पट्टणशेट्टी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करत त्यांच्या दुकानाची नासधूस केली. ही घटना होऊन चार दिवस झाले तरी अद्यापही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.त्या आरोपीला त्वरित अटक न केल्यास न बुधवार दिनांक 18 /9/ 19 रोजी जत बंदचा इशारा देण्याबरोबरच बाजारपेठ येते पोलीस चौकी करण्याची मागणी व्यापारी असोशियन ने केली आहे.व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष किरण बिजर्गी,उपाध्यक्ष प्रज्वल साळे, नगरसेवक इरांण्णा निडोणी,श्याम कोळी,आयुब पटाईत, इरण्णा पटेद,वर्धा राम देसाई ,अमित मोदी, मल्लेश आनंतपुर, सचिन पट्टणशेट्टी,प्रशांत आरगोडी,मनोज साळे,आनंदराव चौधरी,मंजु मोगली,गुरुसिध्द माळी, शांतीलाल ओसवाल,रवी मुडेंचा,सागर कोरे,किसन माळी,कनिष्क मोदी,रोणाराम चौधरी,सागर सोनार, सिधु डोळि,संभाजी पाढंरे,राहुल लोणी आदीच्या निवेदनावर सह्या आहेत.
जत : गुंड सोनुरेला अटक करा,अन्यथा बंदचा इशारा देणारे निवेदन पोलीसांना देण्यात आले.
