संख | पाण्यासाठी निवडणूकावर बहिष्काराचेच अस्ञ | हभप तुकाराम महाराज : आता अखेरच्या संघर्षाची वेळ

0

Rate Card

संख,वार्ताहर : जत पुर्व भागातील सिंचनापासून वंचित पाणी आणायचे तर टोकाच्या संघर्षांची तयारी ठेवावी लागेल,राजकर्त्यांना आपली ताकत दाखविण्याची वेळ आली आहे, जागृत्तपणे निर्णय घ्यावा लागेल,असे प्रतिपादन संत बागडेबाबा आश्रमाचे मठाधिपती हभप तुकाराम महाराज यांनी गुड्डापूर ता.जत येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात केले.

जत पुर्व भागातील सिंचनापासून वंचित गावांचा भव्य एल्गार मेळावा गुड्डापूर येथे संपन्न झाला.यावेळी पुर्व भागातील सुमारे दीड हाजार पदाधिकारी,शेतकरी,नागरिक उपस्थित होते.

हभप तुकाराम महाराज म्हणाले,पाण्यासाठी काढलेल्या संख -मुंबई दिंडी आंदोलनानंतर आलेल्या पत्रात

कृष्णा लवादानुसार जत पुर्व भागातील 64 गावांना पाणी उपलब्ध नसल्याने देणे शक्य नसल्याचे शासनाने म्हटले आहे.त्यामुळे जत पुर्व भागात पाणी आणण्यासाठी लवादाची अतिरिक्त पाणी वापरण्यासाठी परवानगी मिळवावी लागणार आहे. असे असतानाही निवडणूक येत्यात राजकर्ते पाणी देतो म्हणत योजनाची घोषणा करतात.निवडून येतात,पुन्हा पाच वर्षे गायब होतात.ते जतच्या जनतेला त्यांना हवे तसे खेळवत आहेत.त्यामुळे आता जागे होण्याची वेळ आली आहे.आम्ही आंदोलन करूनही सरकार दखल घेत नाही.त्यामुळे आता सरकारला किंबहुना तालुक्यातील मतावर निवडून येणाऱ्या राजकर्त्यांना आपली ताकत दाखवावी लागणार आहे. त्यामुळे यापुढे काहीही केले तरी 64 गावातील नागरिकांनी एकत्र येत करावे लागेल.आमची आंदोलने सरकार सलफ्यावर घेत आहे. त्यामुळे सरकारलाही आता हलवेल अशी आंदोलने करावी लागतील तरचं जत पुर्व भागात पाणी येईल अन्यथा यापुढे आपला अजून किती काळ राजकर्ते वापर करतील हे सांगणे कठिण आहे.तालुक्यात दुष्काळ हटविण्यासाठी गेल्या काही वर्षात कोट्यावधी खर्ची पडत आहेत.मात्र सरकार सिंचन योजना राबवून कायमस्वरूपी दुष्काळ हटविण्यासाठी प्रयत्न करत नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हैसाळ विस्तारित योजनेला तत्वता मान्यता दिल्याचे सांगून गेले,पुढे त्यावर नेते,अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे.त्यामुळे ती योजना म्हणजे सरळ फसवणूक आहे.आम्ही लोकसहभातून कँनॉल काढू अशीही सरकारकडे मागणी केली आहे. मात्र त्यालाही परवानगी दिली जात नाही.त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला जत पुर्व भागातील जनतेनी योग्य निर्णय घेऊन पाणी देणे किती गरजेचे आहे हे दाखवून द्यावे,त्यामुळे येत्या विधानसभा निवडणूकीवर बहिष्काराचे अस्ञ उगारावे लागेल,असेही आवाहन तुकाराम महाराज यांनी शेवटी केले.उद्योगपती अँड.सी.आर.सांगलीकर,

पांडुरंग वाघमोडे,सुनील वाले, व्यंकटेश कुलकर्णी,पाडूरंग सावंत शेतकरी संघटनेचे राजेंद्र पुजारी,बाळासाहेब कोरे,इराया स्वामी,दरीबडचीचे उपसरपंच तात्या चव्हाण,आरपीआयचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हुवाळे,पंचायत समिती माजी सदस्य भैरप्पा माळी,चंद्रशेखर रेबगोंड पुजारी,अमोगशिध्द शेडंगे,चंदु पुजारी यांनी मनोगते व्यक्त केली.सर्वांनी आता पाण्यासाठी आक्रमक लढा उभारू अशी भूमिका मांडली.

निवडणूकीवर बहिष्काराचे अस्ञया शेतकरी मेळाव्यापुर्वी वंचित गावातील अनेक गावांनी विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यापार्श्वभूमीवर मेळाव्यात बहिष्कार टाकणार का या हाकेला सर्वांनी हात उंचावून पांठिबा दिला.त्यामुळे येत्या विधानसभेला पाणी हा मुद्या महत्वपूर्ण ठरणार आहे.मेळाव्यात पाणी दिल्याशिवाय मतदान नाही,आधी पाणी मग मत,आमचं ठरलय,पाणी येईपर्यत मतदान नाही, अशा आशयाचे फलक घेतले होते.

सांगलीकर 20 लाख देणार जत पुर्व भागातील सिंचनापासून गावांना पाणी देण्यासाठी लोकचळवळ उभी केली आहे.पुर्व भागातील जनतेसाठी कँनॉलचे काम लोकसहभातून करण्यासाठी वीस लाख रूपये मी देतो अशी घोषणा उद्योगपती अँड.सी.आर.सांगलीकर यांनी केली.जत पुर्व भागातील पाण्यासाठी प्रंसगी निवडणूकींच्या रिंगणातून माघार घेऊ असेही यावेळी सांगलीकर यांनी सांगितले.

1)जत पुर्व भागातील 64 गावातील सिंचनापासून वंचित गावातील आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना हभप तुकाराम महाराज,2)समोर उपस्थित जनसमुदाय

3) मेळाव्यात असे फलक घेऊन शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.