जत | आमच्यावर आरोप करण्याअगोदर,आत्मचिंतन करा | सरदार पाटील, सुनिल पवार
जत,प्रतिनिधी : निष्ठा आम्हाला कुणीही शिकवू नये,आमच्यावर आरोप करण्याअगोदर आत्मचिंतन करा,असा टोला माजी सभापती प्रकाश जमदाडे यांना जि.प.सदस्य सरदार पाटील व सुनिल पवार यांनी लगावला.
पाटील,पवार म्हणाले,खा.संजयकाका पाटील यांनी मला भाजपचे तिकिट फायनल केले आहे,असे म्हणत आमचे एकेकाळचे सहकारी आम्ही खा.संजयकाकाची बदनामी करत आहोत,असे आरोप करत आहेत.मात्र आमचे दैवत काकावर आरोप करण्याचे पाप कशासाठी करू,असे असताना आपल्या संवग प्रसिध्दीसाठी आमच्यावरचे आरोप बंद करावेत.
प्रत्यक्षात तिकिट कुणाला द्यायचे यावर पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील.मात्र काका माझ्याबरोबर आहेत,माझे तिकिट निश्चित झाल्याचे सांगताना तुम्ही जेथे आहात ते कुणाच्या जीवावर आहात यांचा विचार करावा.आमदार विलासराव जगताप यांनी लिपिक ते बाजार समिती पंचायत समितीचे सभापती केले. त्यांच्याबरोबर तुम्ही किती निष्ठेने राहिल्यात यावर विचार करा,आमचे खा.संजयकाका पाटील व आ.विलासराव जगताप दैवत आहेत.त्यांच्याबरोबर आम्हची निष्ठा कायम राहील.त्यामुळे कुणीही आरोप करताना विचार करावा,जेथे आहात तेथे निष्ठेने रहा असा सल्लाही पाटील व पवार यांनी शेवटी दिला.

