जिरग्याळ तलावात म्हैसाळचे पाणी सोडा : बसवराज पाटील

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात पडलेल्या भीषण दुष्काळाची स्थिती लक्षात घेऊन म्हैसाळ योजना तातडीने सुरू करून 6 व्या टप्प्यातून जिरग्याळ तलावात पाणी सोडून हा तलाव भरावा, अशी मागणी एकुंडीचे सरपंच तथा सरपंच परिषदेचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे केली आहे.

Rate Card

गेल्या अनेक वर्षापासून जिरग्याळ तलाव्याचे काम अपूर्ण राहिले होते. जतचे आमदार विलासराव जगताप यांच्या प्रयत्नाने जिरग्याळ तलावाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.या भागात तीव्र पाणी टंचाई कायम आहे. जिरग्याळ तलावात पाणी सोडल्यास जिरग्याळ,मिरवाड, एकुंडी,वज्रवाड या चार गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकणार आहे.तालुक्यात गेल्या तीन वर्षात दुष्काळामुळे हजारो हेक्टर द्राक्ष,डांळिब बागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.कृषी व महसूल विभागाने पंचनामे करुनही अद्यापपर्यंत नुकसान भरपाई दिलेली नाही.ती द्यावी अशीही मागणी पाटील यांनी खा.पाटील यांच्याकडे केली. 

जत तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले खा.संजयकाका पाटील यांचा संरपच परिषदेचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांनी सत्कार केला

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.