जत पुर्व भागातील नागरिकांचे बंड दरीबडची,तिकोंडी,जालीहाळ बु., भिवर्गी,गिरगावकरांचा बहिष्कारचं

0

संख,वार्ताहर : म्हैसाळ योजनेतून पाणी मिळावे व म्हैसाळ गावाचा समाविष्ट करावा यासाठी संख (ता.जत) येथील ग्रामस्थांनी गावबंद ठेवून जोपर्यंत पाणी मिळत नाही,तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निवेदन ग्रामस्थांनी अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ यांना दिले. जत पूर्वभागातील म्हैसाळ योजनेपासून 64 गावे वंचित आहेत.गेल्या अनेक वर्षापासून या गावांचा समावेश योजनेमध्ये करावा अशी मागणी आहे. मूळात या गावांचा समावेश म्हैसाळ योजनेच्या आराखड्यामध्ये नाही. त्यामुळे या गावांना पाणी मिळणे अशक्य आहे. मात्र सततच्या दुष्काळामुळे परिस्थिती गहन आहे.आजही टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.पाण्यासाठी टाहो फोडत आहेत.गेल्या पन्नास वर्षात पाण्यावर अनेक नेत्यांनी राजकारण केले आहे.आतापर्यंत आश्वासन देऊन अनेकांनी सत्ता मिळविले.मात्र पाणी मिळालेले नाही.त्यामुळे संखसह अनेक गावातील ग्रामस्थ एकत्रित येत निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.तुकाराम महाराज म्हणाले,पाण्यासाठी संघर्ष करण्याची मानसिकता ठेवण्याची गरज आहे.64 गावातील शेतकऱ्यांचा मेळावा गुड्डापूर तलाव येथे रविवारी 15 सप्टेंबरला आयोजित केला आहे या मेळाव्याला उपस्थित राहावे आवाहन केले.या मेळाव्यात शासनाच्या धोरणाचा पोलखोल करणार आहोत.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भीमाशंकर बिरादार म्हणाले,50 वर्षापासून पिण्यासाठी पाणी देऊ न शकलेल्या राजकर्त्याचा धिक्कार आहे.परिस्थिती इतकी बिकट आहे. आम्ही पाणी मिळेपर्यत यापुढच्या निवडणूकावर बहिष्कार टाकत आहोत.यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी मेळाव्याला मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळाला.राजु पुजारी,चंद्रशेखर रेबगोंड,अंकुश हुवाळे,व्यंकटेश जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार :पूर्व भागातील संखसह,तिकोंडी,जालीहाळ बुद्रुक, भिवर्गी,गिरगाव येथील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्धार केला आहे ग्रामपंचायतीने बहिष्काराचा ठराव घेण्यात आले आहेत. यासर्व गावातील ग्रामस्थांनी अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ यांना निवेदन दिले.

Rate Card

 1) संख (ता.जत) येथे म्हैसाळ योजनेतून पाणीसाठी गाव बंद आंदोलन करण्यात आले.2) अप्पर तहसिलदार प्रशांत पिसाळ यांना निवेदन देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.