जतेत दुकानाचे नुकसान केल्याप्रकरणी दोघावर गुन्हा दाखल

0

जत,प्रतिनिधी : जत शहरात बुधवार ता.11 रोजी दुकानाची तोडफोड करत कोयता घेऊन दहशत करणाऱ्या गावगुंडावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.रोहित गुलाब सोनुरे(रा.अचकनहळ्ळी),शहारूख शहाजन कलाकद्दी(रा.जत) असे गुन्हा दाखल गावगुंडाची नावे आहेत.पोलीसांनी दिलेली माहिती अशी,शहरातील शिवाजी चौकातील सचिन सिध्दाप्पा पट्टनशेट्टी यांच्या समर्थ बेकरी या दुकानात बुधवारी सायकांळी सोनुरे व कलादगी यांने कोयता दाखवत 5 हजार रूपयाची मागणी केली.पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी दुकानातील काऊंटर,व अन्य साहित्याची तोडफोड करत जिवेमारण्याची धमकी दिली.यात बेकरीचे 30 हजार रूपयाचे नुकसान झाले आहे. विनोद भाऊसाहेब चोरमुले यांच्या चौकात उभ्या असलेल्या छोटा हत्ती टेम्पोवर कोयता हाणून काच फोडल्याच्या दोन तक्रारी जत पोलीसात दाखल झाल्या आहेत. त्याशिवाय सोनलकर चौकातही असाच प्रकार या दोन आरोपींनी केल्याचे पोलीसांनी सांगितले.दोन्ही आरोपी पोलीस रेकार्डवरील गुन्हेगार आहेत.त्यांच्या शोधासाठी पथके कार्यरत झाली आहेत.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.