विट्यात मोटारसायकल चोरणारी टोळी जेरबंद

0

विटा : विटा परिसरात मोटार सायकल चोरट्याच्या चोरीस पकडत त्यांच्याकडून 15 लाख 80 हजार रूपये किंमतीच्या 31 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.याप्रकरणी सचिन मधूकर भोरे वय 32 (रा.उडगी ता.अक्कलकोट),नामदेव बबन चुनाडे,औंदुबर रमेश उगाडे,गणेश महादेव साळुंखे(तिघे रा.अनिलनगर,झोपडपट्टी पंढरपूर) यांना अटक केली आहे. यातील आरोपी सचिन भोरे हा विटा येथे संशयित मोटारसायकल सह फिरत असताना पोलीसांनी त्याला पकडल्यानंतर हा प्रकार समोर आल.पोलीसांनी टोळीसह सांगली,सातारा,पुणे,सोलापूर या जिल्ह्यातून चोरलेले मोटारसायकली जप्त केल्या आहेत.पोलीस निरिक्षक रविंद्र शेळके यांच्या पथकांने ही कारवाई केली. 

विटा पोलीसांनी मोटारसायकल चोरट्याची  चोरट्याची पकडलेली टोळीसह वाहने

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.