शेतकऱ्यांची क्रूर थट्टा | पीक विम्याचे मिळाले फक्त 88 रूपये | पुर्ण परतावा द्या,अन्यथा आंदोलन : विक्रम परतवा

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : शेतकऱ्यांसाठी सरकार अनेक योजना जाहीर करतं. पण त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. कारण वाटेत अनेक गिधाडं बसलेली असतात. पिकविमा योजनेच्या अंमलबजावणीतही असंच काहीसं झालंय.जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 88,123,175 आणि 350 अशी परतावा रक्कम टाकून विमा कंपनीनं शेतकऱ्यांची थट्टा केलीय.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी सन 2016-16 मध्ये खरीप हंगामातील पिक विमा भरला होता,त्यांचा परतावा तीन वर्षानंतर जमा गेला जात आहे.त्यात शासन नियमांना हारताळ फासत पैसे जमा केले जात आहेत.विमा कंपन्यांनी दुष्काळी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत फसवणूक सुरू केली आहे.या विमा कंपन्यांची चौकशी करून पीक विम्याचा योग्य परतावा रक्कम जमा करावी अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडू असा, इशारा विक्रम ढोणे यांनी दिला आहे.

शासन नियमानुसार पीक विमा परतावा रक्कम एक हजार रुपये पेक्षा कमी येत असल्यास तफावत असलेली रक्कम राज्य शासनामार्फत अदा करण्याचे निर्देश शासनाचे होते.मात्र शासनानेच घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न करता दुष्काळी जत तालुक्यातील शेतकऱ्यांची क्रुर थट्टाच केली आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा हप्त्याची भरलेली रक्कमही परत मिळाली नसल्याचे समोर आले आहे. परतवा देताना शासन निर्णय पायदळी तुडवतं शेतकऱ्यांना 88,123,175,350 अशा नुकसान भरपाई खात्यावर जमा केल्याचे समोर आले आहे. त्यात 

गिरमला काराजनगी (रा.सोन्याळ) भरले 200,परतावा मिळाला 88 रूपये,येताळ गळवे (रा.गोंधळेवाडी)200 भरले, परतावा मिळाला 88,दादासो वगरे (रा.दरबडची)400भरले,परतावा मिळाला 175,मलकाप्पा मुचंडी (रा.सोन्याळ) 280 हप्ता,परतवा मिळाला 123 रूपये,अप्पासाहेब आरळी (रा

संख )800 भरले,परतावा मिळाला 350,सुखदेव बंडगर (आसंगी जत) 1200 भरले,परतावा मिळाला 523, याशिवाय अजूनही अशा परताव्याचे शेतकरी तालुक्यात आहेत.

जत तालुक्यातील शेतकरी कठीण परिस्थितीत दुष्काळाशी सामना करीत असताना विमा कंपनी व राज्य शासन यांच्या अनागोंदी कारभारामुळे नाहक आर्थिक फटका सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर योग्य न्याय देवून योग्य विमा परतावा रक्कम न दिल्यास शासनाला जाग आणू असा इशाराही ढोणे यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.