संखमध्ये ऐतिहासिक मोहरम ताबूतचे विसर्जन

0
Rate Card

संख,वार्ताहर : संख ता.जत येथे ऐतिहासिक मोहरम ताबूतचे 10 व्या दिवशी विसर्जन करण्यात आले.

संख येथे मुस्लिम बांधवाच्या वतीने मोहरम निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.दरवर्षी हिंदू-मुस्लिम समाजाचे नागरिक एकत्र येत हा सण साजरा करतात.सालाबाद प्रमाणे यंदाही लालसाबअली रिवायत मंडळाचा गायन कार्यक्रम संपन्न झाला.मोहरम निमित्त उमदीचे सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर,गुरूबसव पाटील,डॉ.भाऊसाहेब पवार,मैनुदद्दीन जमादार,भिमाशंकर बिराजदार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. ताबुताच्या गावातून मिरवणूक काढण्यात आली.सर्व नागरिकांनी भक्तिभावाने यात सहभाग घेतला.

दत्तात्रय कोळेकर म्हणाले,संखमध्ये तांबुताचे परंपरा जपली आहे.अगदी मशिदीसमोर गणपतीची मुर्तीची प्रतिष्ठापना अशा दुर्मिळ घटना असतात.संखच्या हिंदू-मुस्लिम बांधवांनी ऐतिहासिक महत्व जपत प्रत्येक समाजाचे सांस्कृतिक कार्यक्रम गुण्यागोविंदाचे साजरे करणे हे कौतुकास्पद आहे.हीच ऐक्याची भावना गावाला पुढे नेहणारी असते.असेही कोळेकर म्हणाले.

यावेळी  अशोक मुडेवाडी,अब्बास सय्यद,नबिसाहेब शेख,मलीकसाहेब मुल्ला,बापू माने,रमजान जमादार,मुबारक सौदागर,राजेभक्षर जमादार,रफिक ममदापुरे, डॉ.रगू कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

संखमध्ये ऐतिहासिक मोहरम ताबूतची मिरवणूक काढत विसर्जन करण्यात आले. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.