डफळापूर | बसस्थानकाला 10 लाखाचा निधी | आ.विलासराव जगताप याचे आश्वासन

0

Rate Card

डफळापूर,वार्ताहर : डफळापूर ता.जत येथील जिर्ण झालेल्या एसटी पिकअप शेडसाठी दहा लाखाचा निधी देऊ,प्रशस्त बसस्थानक बनवू असे आश्वासन आ.विलासराव जगताप यांनी दिले. 

डफळापूर ता.जत येथे झालेल्या आ.जगताप यांनी बैठकीत परिसरातील समस्या जाणून घेतल्या.उपस्थित कार्यकर्त्यांनी डफळापूर एसटी पिकअप शेड जिर्ण झाले आहे.ते कधीही ढासळेल अशा स्थितीत आहे.शेडला अतिक्रमणाचा विळाखा पडला आहे.महिला प्रवाशाची गैरसोय होत आहे.शेडचे छत कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे.शेडच्या पाठीमागे महसूल विभागाची जागा आहे.ती अधिगृहीत करून रस्त्यापासून मागे प्रशस्त बसस्थानक बाधणे शक्य असल्याचे आ.जगताप यांच्या निदर्शनास आणून दिले. 

त्यामुळे नवे प्रशस्त बसस्थानक उभे करावे अशी मागणी केली.

त्यावर आ.जगताप यांनी परिसरातील स्वच्छता करून भव्य बसस्थानक बांधू त्यासाठी मी दहा लाखाचा निधी देतो अशी ग्वाही दिली.यावेळी जेष्ठ नेते संभाजी माळी,परशुराम चव्हाण सर,माधवराव चव्हाण, बाजीराव चव्हाण, शिवदास शांत,बाळू शांत आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.