जत | मीच भाजपचा उमेदवार : प्रकाश जमदाडे

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : जत विधानसभा निवडणूकीसाठी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. मी केलेल्या आतापर्यतची कामे व जनतेशी असलेला संपर्क यामुळे मला प्रतिसाद मिळत आहे. मला कोणीही फुस लावली नाही.त्यामुळे खा.संजयकाका यांच्यावर आरोप करणे थांबवावेत,ते जिल्ह्याचे खासदार आहेत.त्यांना प्रत्येक घटकाबरोबर काम करायचे आहे.अशी माहिती पुणे बोर्डाचे संचालक,माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी दिली.

जमदाडे म्हणाले,तालुक्यात मी गेल्या वीस वर्षापासून बाजार समिती,पंचायत समितीच्या माध्यमातून मोठी कामे केली आहे.माझ्या अनुभव व लोकसंपर्काचा पक्ष विचार करले,भाजपकडून मी इच्छुक आहे.कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार आहे.गेल्या दोन तपापासून मी तालुक्यात काम करत आहे.तालुक्यातील अनेक लोकांचे कामे करण्याचा विविध पदाच्या माध्यमातून मी प्रयत्न केला आहे.तालुक्यातील समस्या व विकास व्हावा हे धोरण आहे.जनतेशी कायम संपर्क असल्याने मला प्रंचड प्रतिसाद मिळत आहे.आमचे नेते खा.संजयकाका यांच्यासमोर मी वस्तूस्थिती मांडली आहे.त्यांनी मला निवडणूकीत उतरण्यासाठी प्रयत्न कर,असे सांगितले आहे.त्यामुळे पक्ष विरोधी भूमिका घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.मात्र  खा.संजयकाकावर काही जणाकडून आरोप केले जात आहेत,ते पुर्णत: चुकीचे आहेत.काका जिल्ह्याचे खासदार आहेत,त्यांनी तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र कुणाच्याही विरोधात भूमिका घेतलेली नाही.किंबहुना त्यांनी मलाही विरोधात भूमिका घ्यावी अशी सुचना किंवा फूस लावलेली नाही.त्यामुळे तालुक्यातील जनतेनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये.पक्ष ज्यांच्याबरोबर राहिल त्यांच्याबरोबर काम करण्याची माझी भूमिका आहे.असेही शेवटी जमदाडे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.